आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलीच्या मृत्यूनंतर माहेरी गेलेली पत्नी भेटत नसल्याने पतीने घरी येऊन विष प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना पाचपावली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृतकाची दीड वर्षाची मुलगी आजाराने मरण पावली होती. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोचीपुऱ्यात राहाणारे पिंटू उर्फ राेहित मधुकर कुलसंगे (वय २८) याने घरी विषारी औषध प्राशन केले. त्याला उपचारार्थ मेयो हाॅस्पिटलमध्ये दाखल केले असता ६ एप्रिल रोजी मृत्यू झाला. पिंटुचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला एक दीड वर्षाची मुलगी होती. २७ मार्च रोजी मुलगी आजाराने मरण पावली. त्यानंतर त्याची सासू मुलगी दिपालीला दुखवट्यासाठी घरी घेऊन गेली.
पिंटू पत्नी दीपालीला भेटण्यासाठी सासरी जात असता सासरचे त्याला भेटू देत नव्हते. पिंटुची बहीण स्वाती गेडाम हीने दीपालीशी मोबाइलवर बोलण्याचा प्रयत्न केला असता तिने प्रतिसाद दिला नाही. ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पिंटू बाहेरून घरी आला. त्याच्या हातात फ्रुटी होती. त्याने फ्रुटी ग्लासमध्ये ओतून त्यात विषारी औषध मिसळून प्राशन केले. थोड्याच वेळात त्याची तब्येत बिघडली. त्याला लागलीच मेयोमध्ये दाखल केले असता ६ एप्रिल रोजी मरण पावला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.