आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:पत्नीच्या चितेत पतीने घेतली उडी, विरह सहन न झाल्यामुळे केली आत्महत्या

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्नीच्या चितेत पतीने घेतली उडी

गरोदर पत्नीचा मृत्यू सहन न झाल्याने भडाग्नी दिल्यानंतर पतीनेही तिच्या चितेत उडी घेतली. या वेळी जवळच उभे असलेल्या गावकऱ्यांनी त्याला गंभीर जखमी अवस्थेत वाचवले, परंतु नंतर त्याने विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी घडली. किशोर खाटीक असे आत्महत्या केलेल्या या पतीचे नाव आहे. जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी गावचा रहिवासी असलेल्या किशोर खाटीक या तरुणाशी १९ मार्च रोजी रुचिता चित्तावार (१९) हिचा विवाह झाला होता. ती आपल्या पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती. मात्र, चार दिवसांपूर्वी रुचिता भंगाराम तळोधी येथे आली होती. ती तीन महिन्यांची गरोदर होती. 

ती रविवारी शौचास बाहेर पडली, परंतु बराच वेळपर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, गावालगत असलेल्या विहिरीजवळ तांब्या आणि चप्पल आढळून आली. गोंडपिपरी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर शोधाशोध केली असता विहिरीमध्ये रुचिताचा मृतदेह आढळून आला होता.

बातम्या आणखी आहेत...