आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:कवितेतील सकारात्मकतेला आयएएस आर. विमला यांची कृतिशीलतेची जोड

नागपूर / अतुल पेठकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रशासनाला मानवी चेहरा देण्यावर असतो भर

महसूल खात्याच्या खडकाळ जमिनीत खरे तर कवितेचे तरल बीज रुजणे तसे कठीणच. पण, नागपूरच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी आर. विमला या उत्तम कवयित्री आहेत. त्या “मन विमल’ नावाने उत्तम ब्लाॅग लिहितात आणि त्यांचे स्वत:चे यू-ट्यूब चॅनलही आहे. त्या माध्यमातून त्या सकारात्मक विचारांची पेरणी करीत असतात. कवितेतील सकारात्मकतेला कृतिशीलतेची जोड देत त्यांनी अनेकांच्या जीवनात उजेडाची पखरण केली...

मसुरीला आयएएस प्रशिक्षणासाठी असताना सुमेधा कटारिया या त्यांच्या सहाध्यायी होत्या. त्या उत्तम कविता करतात. त्यांच्यामुळे आर. विमला यांना कवितेची गोडी लागली. सुमेधा कटारिया यांच्या कवितांना कवितेने उत्तर देण्याच्या परिपाठातून कविता रुजली आणि नंतर वाढत गेली. “मनरचनाए’ नावाने त्यांनी फक्त खासगी वितरणासाठी कवितासंग्रह प्रकाशित केला. कुरुक्षेत्र येथील संगीत शिक्षक विकास रेलान यांनी त्यातील १२ कवितांना चाली लावून त्याचा अल्बम प्रसिद्ध केल्याचे आर. विमला यांनी “िदव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

मन मे यही विश्वास लिए कि रात के बाद फिर सुबह होगी कि लौट आएगी फिर रौशनी कि खिल उठेगी जीवन मे फिरसे और मुस्कराएंगे हम मन से... क्योंकि जीवन निराशा से नही आशा से चलती है सिर्फ आशा से...

अशा अनेक कवितांतून त्या सकारात्मक विचार रुजवत जातात. त्याला प्रशासनातही कृतीची जोड देतात. रोजगार हमी योजनेच्या उपसचिव असताना प्रत्यक्ष गावात जाऊन गावकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना सर्व योजनांचे लाभ दिले. पुनर्वसन हा प्रशासनाकरिता जटिल आणि प्रकल्पग्रस्तांकरिता भावनिक गुंतागुंतीचा प्रश्न असतो. पण, कोकणात पुनर्वसन उपायुक्त असताना हळुवारपणे प्रश्न हाताळून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले. आताच्या पालघर जिल्ह्यात जवाहर येथे आदिवासी उपविभागात काम करताना आदिवासींनी त्यांचे हक्क मिळवून दिल्याचे आर. विमल यांनी सांगितले.

राज्य ग्रामीण आजीविका मिशनच्या सीईओ असताना केलेले काम माइलस्टोन ठरल्याचे आर. विमला यांनी सांगितले. त्या वेळी महिलांचे स्वयंसहाय्यता गट स्थापून महिला सक्षमीकरणाचे केलेले काम मनाला समाधान देऊन गेले. त्यानंतर जाईल तिथे महिलांच्या उन्नतीसाठी काम करण्यावर भर असतो, असे त्या म्हणाल्या. गेल्या २७ वर्षांत विविध जबाबदाऱ्या सांभाळताना सकारात्मक कृतिशीलतेवर नेहमीच भर दिला. पाणीपुरवठा विभागात जलजीवन मिशन संचालक असताना नळाला पाणी येते आहे की नाही हे प्रत्यक्ष गावात जाऊन पाहत असे. नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करतो. पण त्याच्या जाण्याने प्रश्न सुटत तर नाहीच, अधिक गंभीर होतात. त्यामुळे आत्महत्या करू नये हे त्यांनी “तुम्हारा जाना’ या कवितेतून मांडले आहे -

तुम चले गए शायद यह सोचकर खत्म हो जायेंगे सारे प्रश्न शी सुरूवात करून त्या म्हणतात - मौसमो का आना जाना कब रूका... पर बहुत कुछ रूक गया तुम्हारे जाने के बाद...

बातम्या आणखी आहेत...