आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • If School Rules Do Not Fit, Then Admission Should Be Taken In Madrassas, Says VHP National General Secretary Milind Parande | Marathi News

दिव्य मराठी मुलाखत:शाळेचे नियम पटत नसतील तर मदरशांत ॲडमिशन घ्यावे, विहिंपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांची रोखठोक भूमिका

नागपूर / अतुल पेठकर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक शिक्षण संस्था आणि शाळेचे नियम असतात. त्याचे काटेकोर पालन केलेच पाहिजे. तिथे धार्मिक कट्टरता आणण्याची गरज नाही, असे सांगतानाच शाळेचे नियम पटत नसतील तर मदरशात ॲडमिशन घ्या, अशी राेखठोक भूमिका विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना मांडली. कर्नाटकातील हिजाब प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना परांडे यांनी हिंदू विरोधकांना खडे बोल ऐकवले.

हिजाब धर्माला आवश्यकच असेल तर आतापर्यंत महिला घालत नव्हत्या त्या काय धर्मविरोधी आचरण करीत होत्या काय, असा सवाल परांडे यांनी केला. जाणीवपूर्वक वादग्रस्त मुद्दे उपस्थित करून हिंदूंना बदनाम करण्याचे हिंदू विरोधकांचे मनसुबे हिंदू समाज उधळून लावेल. शाळेचा गणवेश घालावाच लागेल. उगाच ही नाटके कशाला हवी? हिजाब हा काही धर्माच्या परंपरेबद्दलचा आग्रह अजिबात नाही. हिंदू विरोधी शक्ती हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नियम पटत नसेल तर शाळेत जाऊ नका. तुम्ही मदरशात अॅडमिशन घेऊ शकता. मुद्दामहून जबरदस्ती करीत असाल तर चालणार नाही, असा इशारा परांडे यांनी दिला.

नेमक्या निवडणुका आल्या की असे धार्मिक विषय का येतात? त्यातून धार्मिक ध्रुवीकरण केले जाते, असा सूर समाजमाध्यमांवरील चर्चेत व्यक्त केला जातोय. सूर व्यक्त करणाऱ्यांचा रोख भाजप तसेच संघ परिवाराकडे असतो. पण, हिजाबचा वाद भाजप वा संघाने उकरून काढलेला नाही. तो कुणी सुरू केला, हे सर्वांना माहिती आहे. शाळेत गणवेशातच आले पाहिजे हा आग्रह योग्यच आहे, असे परांडे म्हणाले. देशभरात हिंदू विरोधी वातावरण तयार करायचे आणि वरून हिंदूंनाच दोष द्यायचा असा उलटा कारभार सुरू आहे. हे अजिबात स्वीकारार्ह नाही. हिंदू समाजाकडून याला विरोध झाला पाहिजे, तसा ताे होतही आहे. कायदा हातात घेणाऱ्याला धडा शिकवला पाहिजे, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...