आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा हल्ला:शरद पवारांनी भाजपला नैतिकता शिकवायचे ठरवले तर कठीण होईल : फडणवीसांची टीका

नागपूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवार आणि नैतिकतेचा काय संबंध आहे, असा सवाल करतानाच शरद पवारांनी भाजपला नैतिकता शिकवायचे ठरवले, तर कठीण होईल, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

शरद पवार भाजपला नैतिकता शिकवत असतील इतिहासात जावे लागेल. वसंतदादांचे सरकार कसे गेले, इथपासून सुरुवात होईल. पवार ज्येष्ठ नेते आहेत. ते सतत बोलत असतात. त्यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष द्यायचे नसते, असा टोला फडणवीसांनी मारला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून मते घेतली आणि मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीकरिता विचार, युती आणि पक्षही सोडला. त्यानंतर हिंदुत्वाचा विचारही सोडला. ते कुठल्या नाकाने नैतिकतेच्या गोष्टी सांगतात, असा सवाल फडणवीस यांनी केला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांवर कुणी दबाव आणत असेल, तर हे गंभीर आहे. पण महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष हे निष्णात वकील आहेत. त्यामुळे ते विरोधकांच्या अशा कुठल्याही दबावाला बळी पडणार नाहीत, असेही ते म्हणाले.