आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतातील एकूण लोकसंख्येच्या ५४% ओबीसी आहेत, या वास्तवावर माझी ही सूचना आधारित आहे. काँग्रेस हा नेहमीच ओबीसींचा पाठिंबा मिळत आलेला पक्ष आहे. हा समाज दुखावला गेला असेल तर माफी मागण्यात गैर काय? असा सवाल माजी आमदार आशिष देशमुख यांनी कारणे दाखवा नोटिसीला उत्तर देताना विचारून आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. मला बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये राहुल गांधी यांना केलेल्या सूचनेशी संबंधित विषय आहे. राहुल गांधी यांनी देशभरातील ओबीसी समाजाची माफी मागावी, असे मी सुचवले होते. योग्य निष्कर्ष काढण्यासाठी हा विषय संदर्भासह समजून घेणे आवश्यक आहे. राहुल यांचे “मोदी’ आडनाव असलेल्या व्यक्तींचा संदर्भ देणारे विधान, त्यानंतर त्यांना न्यायालयाने दिलेली २ वर्षांची शिक्षा आणि त्यांचे संसदेचे सदस्यत्व संपुष्टात येणे हा त्याचा मूळ संदर्भ होय. ओबीसी समाजात काँग्रेसच्या विरोधात काही भावना असेल तर माफी मागून प्रकरण संपवले पाहिजे, असे माझे म्हणणे होते. काँग्रेस हा नेहमीच ओबीसींचा पाठिंबा मिळत आलेला पक्ष आहे. हा समाज दुखावला गेला असेल तर माफी मागण्यात गैर काय? “चौकीदार चोर हैं’ प्रकरणी राहुल यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली होती. तसेच राफेल प्रकरणी त्यांनी मे २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली होती, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले आहे.
राहुल यांना केलेल्या सूचनेशी संबंधित विषय होता, तो समजून घ्या नाना पटोलेंवर प्रहार महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही काँग्रेसचे असंख्य ओबीसी नेते आहेत. ते ओबीसींसाठी काय करीत आहेत? ते समाजाची नाराजी कमी करण्यासाठी किंवा त्यांचा योग्य वाटा त्यांना देण्यासाठी काय करत आहेत? दुर्दैवाने काहीच नाही. पक्ष एका नाजूक टप्प्यातून जात असताना, ते अद्याप पक्षांतर्गत गटबाजीत आनंद मानत आहेत, अशी टीका देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केली आहे.
‘खाेका’ विधानावर स्पष्टीकरण नाही एमपीसीसी अध्यक्षांशी संबंधित “खोका’ या माझ्या विधानाचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तथापि, त्याचा अर्थ काढण्याचे काम मी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांवर सोडतो. त्यांनी माझ्या सूचनेचा ज्याप्रमाणे अर्थ काढला, तसा ते या मुद्याचाही काढू शकतात. कोणतेही सबळ कारण नसताना मला नोटीस बजावून, प्रदेश काँग्रेसने आपल्याच लोकशाहीवादी परंपरेचा अपमान केला आहे, असे स्पष्टीकरणही आशिष देशमुख त्यांना बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसीत दिले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.