आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:कोरोनाची दुसरी लाट आली तर सावरायलाही वेळ मिळणार नाही : रमण गंगाखेडकरांचा इशारा

नागपूर / अतुल पेठकर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अधिक सतर्क व्हा, कोरोना पुन्हा डोके वर काढू नये यासाठी नियम पाळा : डाॅ. प्रदीप आवटे

लोकांचा बिनधास्तपणा आणि बेफिकिरी प्रचंड वाढतेय. कोरोनाची दुसरी लाट आली तर आपल्याला सावरायलाही वेळ मिळणार नाही, असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) साथरोग व संसर्गजन्य विभागाचे माजी विभागप्रमुख पद्मश्री रमण गंगाखेडकर यांनी दिला आहे. ‘मला काही होणार नाही, माझी प्रतिकारशक्ती उत्तम आहे, आता तर व्हॅक्सिनही आली आहे,’ त्यामुळे कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्याचे परिणाम पाश्चिमात्य देश भोगतच आहेत. आपल्याकडेही अशीच काहीशी परिस्थिती दिसून येत असून, यामुळे दुसरी लाटच काय, काहीही येऊ शकते, अशी भीतीही गंगाखेडकर यांनी व्यक्त केली आहे.

आरोग्य यंत्रणांवर आधीच खूप ताण
कोरोनामुळे आपल्याकडील आरोग्य यंत्रणांवर आधीच खूप ताण आहे. आता लोकांच्या बेफिकिरीमुळे जर दुसरी लाट आलीच तर केवळ रुग्णसंख्याच नव्हे तर मृत्युदरही वाढेल, अशी चिंता गंगाखेडकर यांनी व्यक्त केली आहे. आज आपल्याकडे ५० टक्केही लसीकरण होऊ शकलेले नाही. कोरोनाशी लढण्यात फ्रंटवर असलेल्या डॉक्टर, नर्स, पोलिस, इतर मदतनीस यांचे आधी १०० टक्के लसीकरण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

अधिक सतर्क व्हा, कोरोना पुन्हा डोके वर काढू नये यासाठी नियम पाळा : डाॅ. प्रदीप आवटे
औरंगाबाद :
राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढत असून प्रत्येकाने अधिक सतर्क होण्याची गरज राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केली आहे. काेराेना वाढीची प्रामुख्याने तीन कारणे दिसून येत असल्याचे ते म्हणाले. यात अचानक आलेली थंडीची लाट, मराठवाडा व विदर्भात मागील काही दिवसांत कमी झालेले तापमान आणि राज्यभरातील १४ हजार ग्रामपंचायतींचे नुकतेच झालेले मतदान हे कोरोना प्रसाराला कारण ठरल्याचे डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना संपला असे समजून लग्न, साेहळे गर्दीत पार पडत आहेत. यामुळे दरराेज ८०० ते १००० रुग्ण राज्यात वाढत असल्याचे ते म्हणाले. ही वाढ फार मोठी होऊ नये यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

गर्दी कमी करणे महत्त्वाचे
काेणत्या भागात कोरोना रुग्णांची वाढ हाेत आहे ते शाेधून त्या भागातील टेस्टिंग वाढवण्यावर भर आहे. मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंगच्या पुढे जाऊन सामाजिक आणि काैटंुबिक कार्यक्रमातील गर्दी कमी करणे तसेच अनावश्यक प्रवास टाळण्यावर भर देण्याची गरज असल्याचे डाॅ. प्रदीप आवटे म्हणाले. याचसोबत प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून कोरोनाबाबतचे नियम पाळणे गरजेचे असल्याचेही डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले आहे.