आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:गडचांदूर येथे कोळशाच्या अवैध साठ्यावर धाड, 25 लाखांच्या कोळशासह एका आरोपीला अटक

चंद्रपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जप्त केलेला कोळसा. - Divya Marathi
जप्त केलेला कोळसा.

गोपनीय माहितीच्या आधारे कोळशाच्या अवैध साठ्यावर पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी सोमवारी धाड टाकून कारवाई केली. धानोरा - गडचांदूर मार्गावरील भोयगावनजीक धाड टाकून लाखोंचा कोळसा जप्त करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या कोळशाचा अवैध व्यापार सुरू आहे. भोयगाव या ठिकाणाहून कंपनीला जाणाऱ्या कोळशाची अवैध वाहतूक या मार्गाने होते. ट्रकचालक आणि कोळसा व्यापारी यांच्या संगनमताने ट्रकमधील कोळसा अवैध रीतीने जमा करून खुल्या मार्केटमध्ये विकला जातो. ही माहिती प्राप्त होताच एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांनी धाड टाकून कोळसा तस्कर शाहरुख ऊर्फ फारुख याच्याकडून अंदाजे पंचवीस लाखांचा २५ टन कोळसा जप्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...