आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:लाॅकडाऊनच्या काळात कापूस खरेदी अशक्य : पणन महासंघाचे अध्यक्ष अनंत देशमुख यांनी व्यक्त केली असमर्थता

नागपूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील ग्रेडर असोसिएशनने दिले खरेदी न करण्याचे पत्र

अतुल पेठकर

कापूस खरेदी करताना सर्वच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे शक्य नाही. यामुळे कापूस खरेदी सुरू करणे शक्य नसल्याची माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष अनंत देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी बुधवार, १५ एप्रिलपासून कापूस खरेदी सुरू करण्यात येईल, असे तावातावात जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर खरेदी सुरू केली तर सरकारला १ हजार ते १५०० कोटींचे नुकसान सोसावे लागेल, असे देेशमुख यांनी स्पष्ट केले. 

आम्हाला एफएक्यू खरेदीची परवानगी आहे. अशा वेळी खासगी व्यापाऱ्यांनाही खरेदीची परवानगी द्यावी लागेल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. सध्या राज्यात ३५ लाख क्विंटल एफएक्यू शिल्लक आहे. एफएक्यू कापूस महासंघ घेईल. पण नाॅन एफएक्यूसाठी खासगी खरेदी सुरू करावीच लागेल, असे अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.

सोशल डिस्टन्सिंगचे आव्हान

एका जिनिंग-प्रेसिंगमध्ये किमान ७५ ते १०० जणांची वर्दळ राहते. शेतकरी, त्याच्या सोबत आलेले ड्रायव्हर व क्लीनर, एक सहायक, पणन महासंघाचे ३ क्लर्क, २ वाॅचमन, १ ग्रेडर असा स्टाफ असतो. शिवाय सरकी मोजणी, गाठी मोजून ट्रकमध्ये लोडिंग व अनलोडिंग, जिनिंग -प्रेसिंगमध्ये परत गाडी रिकामी करणे यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे कठीण होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...