आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सश्रम कारावास:अल्पवयीन मूकबधीर मुलीशी अतिप्रसंग करणाऱ्यास कारावास

वर्धाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेच्या प्रांगणात खेळत असलेल्या अल्पवयीन मूकबधीर मुलीवर बळजबरीने अतिप्रसंग करणाऱ्या वृद्धास न्यायालयाने सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे.

पीडित अल्पवयीन मूकबधीर मुलीच्या आईने २४ ऑगस्ट २०१७ रोजी तिला घरासमोरील शाळेच्या प्रांगणात खेळण्यासाठी सोडले होते. घराशेजारी असलेल्या रघुनाथ गहरू लोखंडे वय ७० रा. तळेगाव ता. आष्टी यांनी मुलीला बळजबरीने घरी नेले व तिच्यावर अतिप्रसंग केला. तिच्या रडण्याचा आवाज पीडितेच्या आईला ऐकायला येताच तिने धाव घेत शेजाऱ्यांना माहिती दिली. पीडितेच्या आईवडिलांनी पाेलिसांत तक्रार दिली. त्यावरून पाेलिसांनी रघुनाथ लाेखंडेविरुद्ध गुन्हा दाखल करत प्रकरण न्यायालयात प्रविष्ट केले. शासकीय अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी ९ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद एेकून अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपीला सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली तसेच पीडितेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...