आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद पेटला:किरकोळ भांडणातून उद्भवलेल्या वादात पत्नीची गळफास तर पतीची विष घेत आत्महत्या

नागपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ भांडणातून उद्भवलेल्या वादात नागपुरातील पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून पतीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली तर पतीने विष घेतले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. कपिलनगर परिसरातील बाबा दिपसिंग गुरुद्वारामागे ही घटना घडली आहे. रितू प्रफुल्ल सहारे (25) असे मृत पत्नीचे नाव आहे. तर प्रफुल्ल सहारे (30) असे उपचार घेत असलेल्या पतीचे नाव आहे.

सकाळी खोलीच्या बाहेर आलेच नाही

गुरुवारी सकाळी दोघेही खोलीबाहेर आले नाही. त्यामुळे प्रफुल्लचा भाऊ प्रशांत याला शंका आली. त्याने त्यांच्या खोलीचे दार ठोठावले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्याने खोलीचे दार तोडले. यावेळी प्रफुल्ल सहारे यांच्या तोडांतून फेस येत होता. याशिवाय रितू सहारे या ओढणीच्या सह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. घटनेची माहिती कपीलनगर पोलिसांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रितू सहारे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. तर प्रफुल्ल सहारेस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पती-पत्नीमध्ये सकाळी भांडण झाल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...