आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • In December And January, People Had A Lot Of Parties, In Whose House Positive Patients Were Wandering Outside; The Administration Did Not Learn Lessons From The First Wave

नागपुरात का वाढला कोरोना:डिसेंबर-जानेवारीमध्ये लोकांनी खूप पार्ट्या केल्या, ज्यांच्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण ते देखील फिरत आहेत बाहेर; प्रशासनाने घेतला नाही पहिल्या लाटेचा धडा

नागपूर ( विनोद यादव)9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आई 3 तास रुग्णवाहिकेत जीवनाशी लढतेय, मुलगा बेडसाठी विनवणी करत राहिला

देशात कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीनंतर बुधवारी देशात पहिल्यांदाच 24 तासांमध्ये 1 लाख 85 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातही दुसऱ्यांदा एका दिवसात 60 हजारांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. covid19india नुसार, महाराष्ट्रात 10 लाख लोकांमागे 4854 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मृतांचा आकडा 479 आहे. तर राज्याची उपराजधानी नागपुरात 10 लाखा लोकांमागे दुप्पटपेक्षा जास्त आहे. मृतांचा आकडाही दुप्पट आहे.

खरेतर नागपुरात रुग्णांच्या डबलिंग रेटमध्ये कमतरता आली आहे. आमच्या चमूने गेल्या चार दिवसांपासून राज्यातील सर्वात जास्त संक्रमित शहरांचा रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आज नागपूरचा ग्राउंड रिपोर्ट....

नागपूर हे मध्य भारताचे वैद्यकीय केंद्र म्हणूनही ओळखले जाते. येथे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील रुग्णही आपले उपचार घेण्यासाठी येतात, परंतु कोरोना संसर्गामुळे येथील रुग्णालयांची व्यवस्थांची पोलखोल झाली आहे. रुग्णालयात बेड नाहीये. रुग्ण त्यांच्या गेटवर किंवा फुटपाथवर पडलेले आहेत. ते वाट पाहत आहेत, की, बेड रिक्त झाल्यावर उपचार करता येतील.

पहिले लोक मनुष्यांना वाचवण्याची प्रार्थना करायचे, मात्र आज अशी स्थिती आहे की, बेड आणि उपचार मिळावे यासाठी लोक प्रार्थना करत आहेत. नागपुरच्या रुग्णालयांची वस्तुस्थिती सांगणाऱ्या तीन हृदयद्रावक घटना...

पहिले दृश्य : सरकारी कोविड रुग्णालय (नागपूर)
वेळ : सकाळी 7 वाजता
आई 3 तास रुग्णवाहिकेत जीवनाशी लढतेय, मुलगा बेडसाठी विनवणी करत राहिला
नागपुरच्या दिघोरी नाका परिसरात राहणाऱ्या रोशन चौधरींची वयस्कर आई कोरोना पॉझिटिव्ह आहेत. आमच्या चमूला रोशन नागपुरच्या सरकारी रुग्णालयाबाहेर भेटला. तो म्हणाला, मी तीन-चार दिवसांपासून रुग्णालयात चक्कर मारत आहे. मात्र कुठेच बेड रिकामा नाही.

अजून जवळपास तीन तासांपासून मी सरकारी कोविड रुग्णालयाबाहेर उभा आहे. माझी कोरोना पॉझिटिव्ह आई तिथे रुग्णवाहिकेत आहे. या रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचे बोलले जात आहे. हे म्हणत रोशन आपल्या आईच्या तब्येतीविषयी चिंतित होतो. त्याचा कंठ दाटून येतो, मात्र त्याच्या वेदना समजून घेणारा आणि अश्रू पुसणारा तिथे कुणीही नाही, कारण नागपुरच्या सरकारी कोविड रुग्णालयाबाहेर सापडणाऱ्या सर्व लोकांच्या वेदना सारख्यात आहेत.

दुसरे दृश्य : नागपूर मेडिकल कॉलेज (NGC)
वेळ : सकाळी 9 वाजता
परिस्थिती गंभीर झाल्यावर रुग्णालयाने बळजबरीने रुग्णाला बाहेर काढले, म्हटले - सरकारी रुग्णालयात घेऊन जा अन्यथा त्याचा मृत्यू होईल. एवढेच नाही, त्या रुग्णालयाने आमच्याकडून बळजबरीने डिक्लेरेशन फॉर्मही साइन करुन घेतला.

तिसरे दृश्य
वेळ - सकाळी 10 वाजता
आईला ऑक्सीजनची कमतरता होती, रिपोर्ट निगेटिव्ह होता, मात्र डॉक्टरांनी कोरोना वार्डमध्ये टाकले.

दुसर्‍या लाटेत प्रशासनाने यंत्रणा शिथिल केली, लोकही निश्चिंत झाले
व्ही-सेवन केअर फाऊंडेशनच्या संस्थापक नीरजा पठानिया म्हणतात की एकदा शहराला असा त्रास भोगायला लागला आहे की ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या अभावामुळे लोक मरत आहेत, तेव्हा आपण कोविडवरील उपचारांची व्यवस्था आणि क्षमता दोन ते तीन पटींने वाढवायला हवी होती.

हे समजू शकतो की पहिल्या लाटेत अधिकारी आणि लोकांना कोरोना विषाणूपासून बचाव कसे करावे हे योग्यरित्या माहित नव्हते. त्यावेळी माहिती आणि जागरूकता या दोन्हींचा अभाव होता, परंतु दुसर्‍या लाटेत जिथे प्रशासनाने यंत्रणा शिथिल केली, तर लोकही निश्चिंत झाले.

'आ बैल मुझे मार' अशी स्थिती
नीरजा म्हणाल्या, या वेळी जर नागपुरात पॉझिटिव्ह सापडले तर त्यांच्या संपर्कात आलेल्या किती लोकांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाली? याचा कोणताही मागमूसही नाही. मी नागपुरातील ज्या कॉलनीमध्ये राहते, ती खूप मोठी कॉलोनी आहे.

पूर्वी कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास संपर्कात आलेल्या लोकांची ट्रेसिंग होत होती, पण आता जर कुणी पॉझिटिव्ह आढळले तर व्यक्ती होम क्वारंटाइन होतो आणि त्याच्या कुटुंबातील लोक आयसोलेशन वार्डात जाण्या ऐवजी बाजारात भाजी खरेदी करतात किंवा सार्वजनिक स्थळांवर दिसतात.

यामुळे मी म्हणते की, नागपुरात रुग्ण वाढण्यामागे ‘आ बैल मुझे मार’ अशी स्थिती आहे. पॉश परिसरांमध्ये अधिक केस असल्याचे मुख्य कारण डिसेंबर आणि जानेवारीमध्ये घरांमध्ये खपू पार्ट्या झाल्या. लोकांनी लपून छपून खूप पार्ट्या केल्या.

गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नाकपूरचे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. अविनाथ गावंडे यांनी सांगितले की, नागपूर मेडिकल हब आहे. येथे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडजवळील जिल्ह्यातून रोज जवळपास 50 हजार ते 1 लोक येतात-जातात. हे देखील येथे टेस्ट करतात, यामुळे पॉझिटिव्ह रेट वाढत आहेत.

नागपुरात अखेर का वाढत आहे संक्रमण, जाणून घ्या 3 कारणे...
पहिले कारण : नवीन स्ट्रेननुसार उपचारांचा प्रोटोकॉल बनला नाही

नागपुरात कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्याचे प्रभारी मंत्री नितीन राऊतांचा दावा आहे की, या स्ट्रेनच्या उपचारांसाठी जे मेडिकल प्रोटोकॉल असायला हवे होते, ते योग्य वेळी बनले नाहीत.

राज्य सरकारने नवीन स्ट्रेनचे सँपल केंद्र सरकारची संस्था ICMR जवळ पाठवले होते, मात्र नवीन स्ट्रेनची संक्रमण क्षमतेसह इतर माहिती देण्यात केंद्रीय एजेंसीने डीद महिना घेतला. मंत्र्यांचा दावा आहे की, नागपुरसह विदर्भाच्या राज्यांमध्ये कोरोना वाढण्यामागे हे प्रमुख कारण आहे.

दुसरे कारण : रुग्ण क्वारंटाइन न होता बाहेर फिरत आहेत
मेडिकल एक्सपर्ट्सचा दावा आहे की, जास्तीत जास्त लक्षण नसलेल्या कोरोना रुग्णांना होमक्वारंटाइन केले गेले होते. अशा लोकांनी काळजी घेतली पाहिजे, मात्र असे पेशेंट क्वारंटाइन राहण्याऐवजी बाहेर निघतात आणि घराबाहेरही फिरत होते. अशा प्रकारे लक्षण नसलेल्या कोरोना रुग्णांनी कळत-नकळत खूप लोकांना संक्रमित केले.

तिसरे कारण : पहिल्या लाटेमध्ये संपूर्ण व्यवस्था होती, दुसऱ्या लाटेत ढासळली
कोरोनाच्या पहिल्या लाटेत संपूर्ण आरोग्य विभाग उपचार आणि व्यवस्थामध्ये व्यस्त होता. ऑक्सिजन-व्हेंटिलेटर बेड्स, आवश्यक औषधे आणि मनुष्यबळ यासारखी यंत्रणा चांगले काम करत होती. मधल्या काळात संक्रमण कमी झाल्यानंतर जेव्हा दुसरी लाट आली तेव्हा पुन्हा या व्यवस्थांना सज्ज करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले.

पहिल्या लाटेमध्ये, ऑक्सिजन बेड घाईत बनवल्या गेल्या,मधल्या काळात अशा बेडच्या ऑक्सिजन लाइनची दुरुस्तीही होऊ शकली नाही. आता अचानक रुग्णांची संख्या वाढली. मेडिकल फॅकल्टीचे टेक्निकल लोक पहिलेच एग्जॉस्ट झाले आहेत.

अनेक स्टाफ मेंबर कोरोनाने संक्रमित झाले होते. ज्यामुळे हे कर्मचारी अशक्त झाले आहेत. यामुळे जेवढ्या मॅनपावरचा सपोर्ट हवा होता, तो मिळू शकत नाहीये. आता आठवडाभरापासून सरकारकडून होम्योपॅथ, आयुर्वेद सर्व फील्डच्या लोकांना एकत्र आणून मदत घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. बेड्स, औषधी आणि इतर आवश्यक गोष्टीही वाढवल्या जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...