आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • In East Vidarbha, The Condition Of The Citizens Is Bad Due To Heavy Rains And Flood Water Entering The Houses; 4 Teams Of NDRF Left For Nagpur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुमशान:पूर्व विदर्भात पावसाने हाहाकार, पुराचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे हाल; एनडीआरएफची 4 पथके नागपूरला रवाना

नागपूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैनगंगा नदीच्या पुरामुळे भंडारा येथे मंदिराला पाण्याने वेढले आहे. - Divya Marathi
वैनगंगा नदीच्या पुरामुळे भंडारा येथे मंदिराला पाण्याने वेढले आहे.
  • कोसळधारेमुळेे पूर संकट; वैनगंगेला 1994 नंतरचा सर्वात मोठा पूर

दाेन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला चांगलेच झाेडपून काढले आहे. विदर्भातील अनेक धरणे भरल्यामुळे नद्यांमध्ये माेठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. विशेष करून पूर्व विदर्भात पावसाने हाहाकार माजवला आहे. मध्य प्रदेशातील चौराई, पेंच व बिना धरणांचे पाणी सोडण्यात आल्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवली आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीतील अनेक गावांत पुराने नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक नद्यांनी धाेक्याची पातळी गाठल्याने धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशार दिला आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यातील कामाठीसह ३६ गावांमधून एनडीआरएफने १४,२३४ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी रविवारी पुण्यातून एनडीआरएफची ४ पथके नागपूरच्या दिशेने रवाना झाली. चंद्रपूर तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील कुही येथे हवाई पाहणी करण्यासाठी दोन टीम पाठवण्यात आल्या आहेत.

एनडीआरएफने केली २५०० नागरिकांची सुटका

बिना कामठी येथील टापूवर चोहीकडे २ किलोमीटर पाण्यात अडकून पडलेल्या ३३ लोकांना काढण्यात एसडीआरएफच्या टीमला यश आले. एनडीआरएफने आतापर्यंत एकूण २५०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.

चिकना गावाला चारही बाजूने १५ फूट पाण्याचा वेढा

कामठीतील चिकना गावाला चारही बाजूंनी १५ फूट पाण्याने वेढा घातला होता. प्रशासन टीम क्रमांक ४ चे ३ अधिकारी व १९ कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी सुमारे ७५० ते ८०० लोकांना सुरक्षित काढणे सुरू केले. दुपारपर्यंत २४० लोकांना बाहेर काढण्यात आले .

गडचिरोली जिल्ह्यातील सहा प्रमुख रस्ते बंद

गडचिरोली जिल्ह्यातील सहा प्रमुख मार्ग बंद झाले असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कित्येक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. गोसेखुर्द धरणातील पाण्याच्या अधिक विसर्गामुळे गडचिरोली जिल्ह्यातील पाच प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. यात गडचिरोलीहून नागपूरकडे जाणारा आरमोरीजवळील पाल व गाढवी नदीच्या पुलावर पाणी असल्याने हा मार्ग तर शिवनी व गोविंदपूर नाल्याच्या पुरामुळे ते चामोर्शी मार्गसुद्धा बंद झाला आहे.

३ धरणांतून विसर्ग, वैनगंगेला महापूर

मध्य प्रदेशातील संजय सरोवर आणि गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोलासह कालीसागर या तीन धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी वैनगंगा नदीला महापूर आला आहे. यामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे मार्ग आणि शेकडो हेक्टरमधील पिके पाण्याखाली गेली आहेत.

वैनगंगेला १९९४ नंतरचा सर्वात मोठा पूर

वैनगंगा नदीला १९९४ नंतर असलेला हा सर्वात मोठा पूर असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे सर्वच ३३ दरवाजे ४ मीटरने उचलण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याचा फटका गडचिरोली जिल्ह्याला बसून अनेक गावांचा पाण्यामुळे संपर्क तुटला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser