आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा कहर:गडचिरोलीमध्ये 72 एसआरपी जवान पॉझिटिव्ह, पोलिस दलातील 205 बाधित

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गडचिरोली जिल्ह्यातील आजवरची सर्वात मोठी लागण, प्रशासन चिंताग्रस्त

शनिवारी एकाच दिवशी राज्य राखीव दलाच्या ७२ जवानांसह अन्य एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. गडचिरोलीचा आजपर्यंतचा कोरोनाबाधितांचा जिल्ह्यातील हा सर्वांत मोठा आकडा आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना पॉझिटिव्ह २७९ व्यक्तींमध्ये २०५ जण पोलिस दलातील आहेत.

शनिवारी कोरोनाबाधित आढळलेले ७२ जवान गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात होते. तर पॉझिटिव्ह आढळलेला अन्य व्यक्ती हा मुंबईहून आलेला आहे. देसाईगंज येथील एसआरपीच्या ४ जवानांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २७९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून ११३ रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले आहेत. सध्या १६५ सक्रिय रुग्णांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तींमध्ये पोलिस दलातील जवानांची संख्या अधिक आहे. सीआरपीएफचे ८८, एसआरपीचे ११५ व बीआरओचे २ असे २०५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहे. हे रुग्ण आता बरे होत आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.