आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण आग:नागपुरात सॉ मिलसह 10 दुकाने जळून खाक, दानागंज हरिहर मंदिर परिसरातील आरा मशीनला गुरुवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास भीषण आग

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील लक्कडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुना भंडारा रोडवर स्थित दानागंज हरिहर मंदिर परिसरातील आरा मशीनला गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आजुबाजूला वेगाने आग पसरल्याने पाच ते सहा आरा मशीनसह १० दुकाने जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या नऊ गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली.

या परिसरात जवळपास १०० आरा मशीन आहेत. तसेच आजूबाजूला असलेली दुकानेही लाकडाची आहेत. संपूर्ण लाकूडफाटा असल्यामुळे आगीने वेगाने पेट घेतला. एकमेकांना लागून असल्यामुळे आग इतर ठिकाणी पसरण्याचा धोका होता. स्थानिक आरा मशीन मालकांनी त्यांचा जमेल तेवढा लाकूडफाटा बाहेर आणून ठेवला. यामध्ये सुमारे पाच ते सहा आरा मशीनसह १० दुकाने जळून खाक झाली. एका आरा मशीनच्या कुंपणाला लागून रोहित्र आहे. त्यातून उडालेल्या ठिणगीतून ही आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे.