आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांत गुन्हा दाखल:नागपुरात मध्य रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवत 11जणांची 68 लाखांची फसवणूक

नागपूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र तसेच राज्य सरकारी सवेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूकीचे प्रकार नेहमी घडतात. पोलिसांतर्फे याविषयी जनजागृतीही केली जाते. तरीही लोक फसवणूकीला बळी पडतात. असेच एक उदाहरण नागपुरला उघडकीस आले. मध्य रेल्वेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी देखरेख या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन 11 जणांची 68 लाख 30 हजार रूपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी वाठोडा पोलिस ठाण्यांत भांदवि कलम 420, 406, 465, 467, 468 व 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी अटकेच्या भीतीने फरार झाले असून त्यांच्या अटकेसाठी पथके पाठवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील शेखर दशरथ बोरकर (वय २७) हे नोकरीच्या शोधात होते. दरम्यान ते नागपुरातील वाठोडा भागातील आरोपी आशीष प्रदीप गोस्वामी व कवीता आशीष गोस्वामी यांच्या संपर्कात आले. बोरकर यांच्यासारखेच नोकरीच्या शोधात असलेले त्यांचे मित्रही गोस्वामी दाम्पत्याने टाकलेल्या जाळ्यात अलगद फसले. त्यांना दक्षिण मध्य रेल्वेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी देखभाल पदावर नोकरीवर लावून देतो असे सांगितले. त्या नंतर बोरकर यांच्या मेल आयडीवर बनावट नियुक्तीपत्रही पाठवले व त्यांच्याकडून वेळोवेळी फोन पे, गुगलपेद्वारे 10 लाख रूपये घेतले. याशिवाय त्यांच्या इतर मित्रांकडून वेळोवेळी 58 लाख 30 हजार रूपये उकळले. या प्रकरणी वाठोडा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...