आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • In Nagpur, After Blackmailing A Woman And Demanding Physical Pleasure, The Shopkeeper Was Arrested As Soon As The Case Was Registered; Money Was Also Demanded

नागपुरात महिलेला ब्लॅकमेल करून शारीरिक सुखाची मागणी:गुन्हा दाखल होताच दुकानदाराला अटक; पैशाची देखील केली होती मागणी

नागपूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलेला ब्लॅकमेल करून शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या एका हार्डवेअर दुकान चालवणाऱ्या व्यापाराला जरीपटका पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. 58 वर्षीय इंद्रदेव घनसानी असे आरोपीचे नाव आहे. जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीत सांगितल्या प्रमाणे पोलिस स्टेशन हद्दीतील पीडित महिलेला आरोपीने फोन करून आपल्या दुकानात बोलावले होते. महिला दुकानात पोहोचली तेव्हा या महिलेला आरोपीने काही ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवले.

या महिलेचे आणि काही लोकांशी अनैतिक संबंध असल्याचा हा पुरावा असल्याच महिलेला आरोपीने सांगितले. ऑडिओ क्लिप व्हायरल करून समाजात बदनामी केली जाईल असे आरोपीने महिलेला धमकावले. ऑडिओ क्लिप व्हायरल करायची नसेल तर एक लाख रुपये द्यावे लागेल अशी मागणी आरोपीने महिलाकडे केली. आणि एक लाख रुपये दिले नाही तर आपण सांगू त्या व्यक्तीकडे जाऊन त्या लोकांशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील अशी धमकीही आरोपीने महिला दिली.

या संपूर्ण प्रकरणात घाबरलेल्या महिलेने आधी पोलिस स्टेशन गाठले आणि या संदर्भात तक्रार दाखल केली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी घनसानी विरोधात वसुली, ब्लॅकमेलिंग करणे आणि धमकावण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात हनी ट्रॅपचा काही संबंध आहे का? काही व्यापारी आणि दुकानदार यांच्याकडे महिलांना पाठवून त्यांचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून धमकावल्याचे आणखी काही प्रकरण आहे का या संदर्भातही पोलिस तपास करत आहेत.

दुसऱ्या एका प्रकरणांत नागपूरच्या उमरेड रोड परिसरातील राहुल नगरमध्ये कामावरून घरी परत जाणाऱ्या तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या परिसरातल्या एका झुडपात तरुणीला ओढत नेत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला आहे. संदीप कोल्डी असे 29 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपी पारडी येथील रहिवासी आहे. तो एका रेस्टॉरंट मध्ये काम करतो.

हुडकेश्र्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भागात आरोपीच्या परिचयातील तरुणी कामावरून घरी जात असताना आरोपी संदीप कोल्डी याने तिला थांबवत तोंड दाबून बाजूच्या झुडुपात नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. तरुणीने आरडाओरड केली असताना नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. नागरिकांनी तरुणीची सुटका करत आरोपीला चांगला चोप दिला. आरोपी हडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात आहे.

बातम्या आणखी आहेत...