आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूरमध्ये मनोरुग्णाचा मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी पीएसआयसह हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सप्टेंबर २०१९ मधील हे प्रकरण आहे.
नेमके प्रकरण काय?
उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उत्तरला तहसीलीतील जैलया गजपूर निवासी फैजान अहमद नसीब अली (वय ३६) याचा मारहाणीत मृत्यू झाला होता. फैजान अहमद नसीब अली मनोरूग्ण असतानाही उपरोक्त आरोपींनी त्याचे हातपाय दोरीने बांधून त्याला मारहाण केली. मारहाणीत जखमी झाल्यानंतरही त्याला उपचारार्थ दाखल केले नाही. शेवटी जखमी फैजानचा मृत्यू झाला. त्याकाळी हे प्रकरण खूप गाजले होते. या प्रकरणी सक्करदरा पोलिस ठाण्यात गुरुवारी तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित पांडुरंग सिद तसेच हवालदार कैलास दामोदरसह अन्य कर्मचाऱ्यांविरुद्ध भादंवि कलम ३०४, ३४२, सहकलम १०८ मेंटल हेल्थ केअर अॅक्ट २०१७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीआयडी चौकशीत दोषी
सीआयडी चौकशीत दोषी आढळून आल्यानंतर सीआयडी पोलिस अधीक्षक सुरेंद्र धुमाळे यांच्या तक्रारीनंतर सिद आणि दोमादरसह मेहरास सर्फुद्दीन शेख, युसूफ हसन खान, अनवर हुसैन जिगरी भाई तसेच दर्ग्यात राहणारे एका अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.