आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढा पेटला:नागपुरात जय विदर्भ पार्टीतर्फे स्वतंत्र विदर्भाकरिता ठिय्या; केंद्र आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जय विदर्भ पार्टीतर्फे आज 1 जून रोजी विदर्भ चंडिका मंदिर, शहीद चौक इतवारी येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. विदर्भ चंडिकेची महाआरती करून सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात ठिय्या देण्यात येऊन निषेध करण्यात आला.

जय विदर्भ पार्टी विदर्भातील जनतेच्या समस्याकरता सातत्याने लढा देत असून, सर्व समस्यांचे एकच उपाय म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्य, म्हणून हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. ठिय्या आंदोलना दरम्यान स्वतंत्र विदर्भ राज्याची तात्काळ निर्मिती करा, घरघुती वीज बिलातून विदर्भातील जनतेला 200 यूनिटपर्यंत मुक्त करा, त्यांनतरचे दर निम्मे करा, शहरी व ग्रामीण भागातील लोडशेडींग बंद करा, वीज कापणे बंद करा, कृषी पंपांच्या वीज बिलातून शेतकऱ्यांना मुक्त करा, विदर्भातील उद्योगांना मिळत असलेली 1200 कोटी रुपयांची वीज सबसिडी बंद करण्यात आली असून सबसिडी पुन्हा जाहीर करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

ठिय्या आंदोलनाला जय विदर्भ पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार, उपाध्यक्ष मुकेश मासुरकर, श्रीमती रंजना मामर्डे, महासचिव विष्णूपंत आष्टीकर, सहसचिव गुलाबराव धांडे, पॉलिट ब्युरो सदस्य तात्यासाहेब मते, सुनीता येरणे, अरविंद भोसले, मध्य नागपूर अध्यक्ष नरेश निमजे, उत्तर नागपूर विधानसभा अध्यक्ष ज्योती खांडेकर, दक्षिण नागपूर अध्यक्ष राजेंद्र सतई, दक्षिण-पश्चिम अध्यक्ष अशोक पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...