आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर रेल्वे स्थानकावर दीड महिन्यांपूर्वी, 9 मे रोजी 30 किलो 340 ग्रॅम गांजा बेवारस आढळून आला होता. या प्रकरणी नागपूर रेल्वे पोलिसांनी मूळ गुन्हेगाराचा माग काढून त्याला राजस्थानातून शिताफीने अटक केली.
9 मे रोजी समता एक्सप्रेसच्या डीएल 1 कोचमध्ये एका प्लास्टिकच्या पोत्यात सुमारे 3 लाख रुपये किमतीचा 30 किलो 340 ग्रॅम गांजा आढळून आला होता. यात माल बेवारस असल्याने आरोपी विषयी काहीही माहिती नव्हती. त्यामुळे रेल्वे पोलिसांसमोर आरोपीला शोधून काढण्याचा प्रश्न होता.
राजस्थानातून अटक
पोलिसांनी शोध घेतल्यानंतर त्यांना आरोपी सौरभकुमार धर्मपाल कुमार याचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यावरून पोलिसांनी सीडीआर तसेच एसडीआर वरून तपास करीत त्याचा नेमका ठावठिकाणा शोधून काढला. तो राजस्थानमधील झुनझुना तालुक्यातील कोहाळवास येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एक पथक त्याला अटक करण्यासाठी राजस्थानला रवाना झाले. तिथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता गांजा ओदीशातील मलकानगिरी येथून खरेदी केल्याचे सांगितले.
आरोपी करायचा चिल्लर विक्री
अशा मालाची चिल्लर विक्री आपण करीत होतो, अशी कबुलीही सौरभकुमार धर्मपाल कुमार याने दिली. रेल्वेने गांजा वा मादक पदार्थाची तस्करी करताना बहुतांश वेळा आराेपी ओळख लपवून प्रवास करतात. त्यामुळे अशा आरोपींना पकडणे जिकीरीचे काम असते. रेल्वे पोलिसांनी मोबाईल फोनच्या आधारे ठाकठिकाणा काढून आरोपीला अटक केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.