आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • In The Case Of Obstructing Government Work And Assaulting, The Husband Of A Female Police Officer Was Sentenced To Rigorous Imprisonment

कारावास:शासकीय कामात अडथळा व मारहाण केल्या प्रकरणी, महिला पोलिसाच्या पतीला सश्रम कारावास

वर्धा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारंजा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या पतीने शासकीय कामात अडथळा व मारहाण केल्या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला ६ महिने सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. कारंजा पोलिस ठाण्यात तक्रारकर्ते पोलिस कर्मचारी मनोज सुखदेव सूर्यवंशी हे २३ मे २०२० रोजी शासकीय कामात व्यस्त असताना त्यांच्या शेजारी आरोपीची पत्नी महिला पोलिस कर्मचारी या बसलेल्या होत्या. दरम्यान आरोपी अयफाज जमीर शेख हा रात्रीच्या वेळी पोलिस ठाण्यात आला आणि पोलिस कर्मचाऱ्याला अश्लिल भाषेत शिवीगाळ करत माझ्या पत्नीच्या शेजारी का बसला असे म्हणत मारहाण केली होती. याप्रकरणी कारंजा पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली होती.

बातम्या आणखी आहेत...