आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मेस्टा'तर्फे विधानसभेवर मोर्चा काढणार:5 हजार शिक्षक व संस्थाचालकांचा असेल सहभाग

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनतर्फे पाच हजार शिक्षक व संस्थाचालकांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मेस्टाने दिली आहे.

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन नागपूर जिल्ह्याच्या त्रैमासिक आमसभेची बैठक सेंट पॉल हायस्कूल हुडकेश्वर येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत विभिन्न तालुक्याचे तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. मागील तीन महिन्यातील कार्यकारिणी केलेल्या कामाचा आढावा ठेवण्यात आला.

आरटीई प्रतिपूर्ती बाबत शासनाची उदासीनता बघता व शालेय शिक्षण विभागाकडे अनेक प्रश्न प्रलंबित असल्या कारणाने येत्या हिवाळी अधिवेशनात संघटनेतर्फे विधानसभेवर पाच हजार शिक्षक व संस्थाचालकांचा मोर्चा नेण्याबाबतचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजाभाऊ टाकसाळे व डॉ. निशांत नारनवरे होते. त्याचबरोबर निरू कपाई, कपील उमाळे, गजेंद्र चौकसे, सुधाकर कांबळी, ऋषिकेश किंमतकर व प्रशांत शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या आंतरिक कलहामुळे देशभरात शालेय स्पर्धा आयोजित होणार नसल्याचे कळले. त्यावर उपाय म्हणून किमान राज्यभरात तरी शालेय क्रीडा स्पर्धा व्हाव्यात याबद्दलची मागणी शासनाकडे करण्यात आली. त्या अनुषंगाने शासनाने संघटनेची मागणी मान्य केली व आता राज्यभरात शालेय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहे.

शालेय क्रीडा स्पर्धेत सीबीएससी व स्टेट बोर्डाच्या शाळेच्या नोंदणी शुल्कामध्ये असलेली तफावत दूर करण्याबाबत केलेली विनंती प्रशासनाने मान्य केली. आरटीई प्रतिपूर्तीसाठी 30 डिसेंबर 2027 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होण्याबाबत मुख्यमंत्री यांना पत्र दिले असून पाठपुरावा सुरू असल्याबाबत व त्यासंबंधी पुढील कारवाई करण्याबाबतचा ठराव घेण्यात आला. आरटीईची प्रतिपूर्ती शासनाकडून होण्यासाठी विलंब लागतो. त्याचा भूर्दड शाळा संचालक यांना सहन करावा लागतो. हे लक्षात घेता सरकारने आरटीईची प्रतिपूर्ती वेळच्यावेळी करायला हवी. मोर्चातही ही मागणी लावून धरली जाईल. या शिवाय इतरही मागण्यांसाठी जोरदार प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...