आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 मोठ्या उद्योगांवर छापेमारी:नागपूरमध्ये आयकर विभागाची कारवाई, अघोषित संपत्ती उघड होण्याची शक्यता

नागपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये तीन मोठ्या उद्योगांवर आयकर विभागाने गुरूवारी धाडी टाकल्या. तीन उद्योगांशी संबंधित १२ ठिकाणांनी धाडी टाकण्यात आल्या. तिन्ही उद्योगांच्या कागदपत्रांची पडताळणी आज शुक्रवारीही सुरू होती.

धाडी टाकताना आयकर विभागाकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली. नागपूरमधील विठोबा उद्योगासहित ३ मोठ्या उद्योगांवर आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने केली. कोणत्याही ठिकाणी अशी कारवाई करण्यापूर्वी अधिकाऱ्यांना सकाळीच हजर व्हायला सांगितले जाते. मात्र, नागपुरातील कारवाईआधी आयकर विभागाने अधिकाऱ्यांच्या पथकाला सकाळी ११ वाजता बोलावल्याचे समजते.

अघोषित संपत्ती उघड होण्याची शक्यता

नागपूरमध्ये गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच मोठ्या उद्योग समुहांवर धाडी पडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाची धाड दोन दिवस चालणार आहे. या कारवाईतून कोट्यवधी रुपयांची अघोषित संपत्ती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कंपन्यांवर धाडी

आयकर विभागाच्या पथकांनी एकाच वेळी पिनॅकल ग्रुपच्या ८ ठिकाणी, विठोबा ग्रुपच्या २ ठिकाणी आणि मगनमल हिरामल ग्रुपच्या २ ठिकाणांवर धाडी टाकल्या. पिनॅकल ग्रुप टेक्नॉलॉजी, मार्केटिंग आणि मेसेजिंग सर्व्हिसेस क्षेत्रात कार्यरत आहे. उद्योग समूहाचे संचालक श्रीवास्तव आणि मुखर्जी आहे.

यापूर्वीही कारवाई

पिनॅकल ग्रुपचे कार्यालय गुडगावमध्ये आहे. त्याचबरोबर विठोबा ग्रुपच्या नागपूरमधील एमआयडीसी स्थित असलेल्या फॅक्टरी आणि तीन पाटर्नसच्या ठिकाणांवर धाड टाकण्यात आली. विठोबा उद्योग समूहाला माल पुरवठा करणारी फर्म मगनमल हिरामलच्या घरासह आणि इतवारी स्थित असलेल्या दुकानावरही आयकर विभागाने कारवाई केली. यापूर्वीही नागपुरात आयटीच्या धाडी पडलेल्या आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काही प्रतिष्ठानासह त्यांच्या निकटच्या लोकांकडे धाडी घालण्यात आल्या होत्या.

.

बातम्या आणखी आहेत...