आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयकर छापे:नागपुरातील 3 मोठ्या उद्योगांवर आयकर छापे

नागपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये तीन मोठ्या उद्योगांवर आयकर विभागाने गुरुवारी छापे मारले. या उद्योगांशी संबंधित १२ ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या असून तिन्ही उद्योगांच्या कागदपत्रांची पडताळणी शुक्रवारीही सुरू होती. या धाडी टाकताना आयकर विभागाकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे. नागपूरमध्ये गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच मोठ्या उद्योग समूहांवर धाडी पडल्या आहेत. आयकर विभागाचे छापे दोन दिवस सुरू होते. या कारवाईतून कोट्यवधी रुपयांची अघोषित संपत्ती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयकर विभागाच्या पथकांनी एकाच वेळी हे छापे मारले. यात दंतमंजन उत्पादक कंपनी आणि तिला माल पुरवठा करणाऱ्या पार्टनरच्या घरासह इतवारीस्थित दुकानावरही आयकर विभागाने कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...