आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांकडील 11.5 कोटी रुपयांची 289.57 मेट्रिक टन बेहिशेबी सुपारी ईडीने जप्त केली आहे. ईडीच्या तपासात इंडोनेशियन सुपारीचे पुरवठादार, कमिशन एजंट, लॉजिस्टिक प्रोव्हायडर, ट्रान्सपोर्टर्स, हवाला ऑपरेटर आणि खरेदीदार यांचे एक सुसंघटित सिंडिकेट असल्याचे समोर आले आहे. हे सिंडीकेट भारत-म्यानमार सीमेवरून इंडोनेशियन सुपारीची भारतात तस्करी करत होते.
अंमलबजावणी संचालनालय, ईडीने गुरूवार 1 डिसेंबर रोजी नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांकडे छापेमारी केल्यामुळे नागपुरसह मध्य भारतातील सुपारी व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील सुपारीकिंग छटवाल याला आसाम पोलिसांनी अटक केल्याच्या बातमी नंतर प्रकाश गोयल, आसिफ कलीवाला, दिग्विजय ट्रान्सपोर्टचे हिमांशु भद्रा आदींवरही छापे मारल्याने सुपारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पीएमएलए अंतर्गत मुंबई आणि नागपूरमध्ये 17 प्रतिष्ठानांची झडती घेण्यात आली. इंडोनेशियन सुपारीच्या तस्करीमध्ये गुंतलेल्या विविध व्यक्तींचे कार्यालय आणि निवासी परिसर समाविष्ट होता. प्रामुख्याने भारत - म्यानमार सीमेवरून सुपारीची तस्करी होते. ईडीच्या झडतीदरम्यान, नागपूर येथे पीएमएलए अंतर्गत अंदाजे 11.5 कोटी रुपयांची 289.57 मेट्रिक टन बेहिशेबी सुपारी जप्त करण्यात आली आहे. ईडीने 16.5 लाख रुपये रोख आणि विविध कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.
छापेमारी केलेले सर्व व्यापारी विदेशी सुपारी आयात करणारे आहे. यापूर्वीही ते वेगवेगळ्या चौकशी एजंसीच्या रडारवर आलेले आहे. ईडीच्या टिममध्ये मुंबईसह अन्य शहरातून आलेले अधिकारी आहे. या छापेमारीची बातमी वाऱ्याच्या वेगाने शहरात पसरल्याने इतर सुपारी व्यापारी सावध झाले.
नागपुरात सुपारी व्यापाऱ्यांकडे धाडी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 1 जुलै 2021 रोजी सीबीआयने नागपुरातील तीन सुपारी व्यापाऱ्यांकडे धाडी घातल्या होत्या. 15 हजार कोटींचा घाेटाळा असल्याच्या संशयावरून नागपुरातील तीन व्यापाऱ्यांकडे धाडी घालीत दस्तावेज ताब्यात घेतले होते. सडक्या सुपारीचा गोरखधंदा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे सरकारचा कोट्यवधीचा कर बुडवणारे सुपारी व्यापारी नागपुरात आहे. सीबीआयने धाडी घातलेल्या सुपारी व्यापाऱ्यांमध्ये मोहंमद रजा अब्दुल गनी तंवर, बुरहान अख्तर, हिमांशु भद्रा यांचा समावेश होता.
नागपुरात केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी नेहमी पडत राहातात. यापूर्वी 2017 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रची 836 कोटी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या मेसर्स सिद्धिविनायक लॉजिस्टिक लिमिटेड (सीव्हीएलएल) कंपनीच्या नागपूरसह देशभरातील ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले होते. यामध्ये नागपुरातील सिद्धिविनयाक फार्म फ्रेश प्रायव्हेट लिमिटेडच्या गुमथळ्यातील पाच एकर जागेवरीही ईडीने टाच आणली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.