आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता वाढवणारी बातमी!:नागपूरमध्ये ‘स्वाईन फ्लू’ च्या संसर्गात वाढ; आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू

नागपूर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरमध्ये ‘स्वाईन फ्लू’ चा संसर्ग वाढत असून सध्या शहरातील विविध रुग्णालयांत या आजाराचे तब्बल 46 रुग्ण दाखल आहेत. तर आतापर्यंत 3 रूग्णांचा मृत्यू झाला असून, दोघे व्हेंटिलिटरवर असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

‘स्वाईन फ्लू’चे वाढले रुग्ण

नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहराच्या दोन वेगवेगळ्या आरोग्य उपसंचालक कार्यालयात झालेल्या स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून तीन मृत्यूंचा अहवाल ठेवला गेला. त्यातील एका मृत्यूला ‘स्वाईन फ्लू’ तर दुसऱ्याचे कारण इतर असल्याचे स्पष्ट झाले. नागपूर महापालिकेकडून एकूण 3 मृत्यूंचा अहवाल ठेवला. त्यात दोन मृत्यू नागपूर शहरातील तर एक जिल्ह्याबाहेरील रुग्णाचा होता. हे तीनही मृत्यू ‘स्वाईन फ्लू’ने झाल्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे येथील ‘स्वाईन फ्लू’ची मृत्यूसंख्या 3 नोंदवली गेली.

आतापर्यंत 75 रुग्णांनी नोंद

दरम्यान, नागपूरच्या विविध रुग्णालयांत आजपर्यंत ‘स्वाईन फ्लू’चे तब्बल 75 रुग्ण नोंदवले गेले. त्यातील सर्वाधिक 45 रुग्ण हे नागपूरच्या शहरी भागातील आहे. तर 24 रुग्ण ग्रामीणसह जिल्ह्याबाहेरील आहेत. एकूण रुग्णांपैकी 19 जण बरे होऊन घरी परतले आहे, तर 46 रुग्णांवर विविध खासगी व शासकीय रुग्णालयांत उपचार सुरू आहे. त्यातील 2 अत्यवस्थ रुग्ण हे जीवनरक्षण प्रणालीवर आहेत, तर 6 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णामध्ये मेडिकल रुग्णालयातील एका डॉक्टरचाही समावेश आहे. या डॉक्टरची प्रकृती आता बरी आहे.