आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविदर्भ जनजागरण ही संस्था विदर्भावर होत असलेला अन्याय, विदर्भाचा आर्थिक विकास आणि स्वतंत्र विदर्भ राज्य यासाठी सतत झटत असते. या संस्थेचे संयोजक आणि विदर्भवादी नितीन रोंघे यांनी "प्रश्न विदर्भाचे' ही पुस्तिका प्रकाशित केली असून विदर्भातील सर्व विधानसभा व विधानपरिषद सदस्यांना पुस्तिका भेट म्हणून देणार असल्याची माहिती रोंघे यांनी पत्रपरिषदेत दिली.
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर १९ डिसेंबरपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. परंतु आमची हि सुद्धा कल्पना आहे कि स्वतंत्र विदर्भ राज्य होईपर्यंत इथला विकास थांबता कामा नये. घटनेतील कलम ३७१ (२) व नागपूर करार व महाराष्ट्रातील २३% जनता म्हणून आमचं स्वतंत्र राज्य मिळेपर्यंत आपला विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठीच या "प्रश्न विदर्भाचे" ही पुस्तिका काढली आहे. ही पुस्तिका विदर्भातील सर्व विधानसभा व विधानपरिषद सदस्यांना देत असून त्यांनी हे प्रश्न विधिमंडळात उचलून विदर्भातील विकासाला चालना द्यावी, अशी अपेक्षा रोंघे यांनी व्यक्त केली आहे.
२०१४ ते २०१९ हा काळ घ्या किंवा गेलेली ३ वर्षे बघा, कुठला तरी मोठा उद्योग, कुठला तरी पाटबंधारे प्रकल्प किंवा विकासासंबंधी कुठलीही चांगली योजना विदर्भात आली नाही. पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्तरावर घोषित केलेल्या विकासयोजना असो, गतिशक्ति योजना असो किंवा विदर्भाचा विकासात्मक चेहरामोहरा बदलणारा रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प असो, प्रत्येक वेळी विदर्भाच्या तोंडाला पानेच पुसण्यात आलेली आहे. परिणामी नागपुरातील ६०% युवक एक तर बेरोजगार आहे किंवा त्यांना साध्या नोकऱ्या करण्यासाठी त्यांना विदर्भातून पलायन करावे लागत आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही असे रोंघे यांनी म्हटले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील आमदार विकास कामांचा प्रश्नावर पक्ष भेद बाजूला सारून एकत्र येतात. तशी एकजूट वैदर्भीय लोकप्रतिनिधींमध्ये दिसत नाही, अशी खंत रोंघे यांनी व्यक्त केली आहे. विदर्भातील विधानसभेतील ६२ व विधान परिषदेतील जवळपास १० सदस्यांनी पक्ष बाजूला ठेवून विदर्भासाठी आवाज उठवला तर विदर्भाचे अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. विधिमंडळात संख्येने कमी असले तरी विदर्भाच्या भूमीत अधिवेशन होत असतांना विदर्भातील २.५ कोटी जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आज गृह, वित्त व नियोजन, जलसंपदा, ऊर्जा ही सर्व महत्वाची खाती विदर्भाकडे आहे. त्यामुळे आता विदर्भाचे प्रश्न सुटले नाही तर ते परत कधीही सुटणार नाही, असे रोंघे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.