आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल निनोचा ह्या वर्षी भारतावर किंचित परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण सध्या अल निनो न्युट्रल असून हळूहळू मान्सूनच्या ऑगस्टमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. असे असले तरी देशात 90 % पेक्षा अधिक पाउस पडेल असा अंदाज हवामान तज्ज्ञ सुरेश चोपणे यांनी वर्तवला आहे.
भारताला मान्सूनच्या दुसऱ्या शाखेचा फायदा आहे. बंगालची खाडी आणि अरबी समुद्रातून आपल्याला पाऊस मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात अल निनो असून सुद्धा 90 % पेक्षा अधिक पाऊस पडेल, असे चोपणे यांनी स्पष्ट केले आहे.
मान्सूनवर तीव्र प्रभाव
सुरेश चोपणे म्हणाले, प्रत्येक 3 वर्षानंतर अल निनोचा प्रभाव दिसतो. मात्र, तीव्र स्वरुपाचा अल निनो 7 ते 10 वर्षांनी येतो. अल निनोचा प्रभाव बहुदा 1 वर्षे किंवा अधिक जाणवतो. परंतु त्याचा प्रभाव किती आहे त्यावर पाऊस किती कमी येणार हे अवलंबून असते. सशक्त, मध्यम आणि अशक्त अल निनो अशी त्याची 3 भागात विभागणी केली जाते. सशक्त अल निनो असेल तर मान्सूनवर तीव्र प्रभाव जाणवतो. मात्र अल निनो अशक्त असेल तर प्रभाव फारसा जाणवत नाही.
अल निनो असताना कमी दुष्काळ
सुरेश चोपणे म्हणाले, मागील 20 अल निनो वर्षाचा इतिहास पाहिला असता भारतात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला होता. मागील 5 वर्षांमध्ये तीव्र अल निनोचा इतिहास पाहता भारतात अत्यंत कमी पाऊस पडला. आणि मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला होता. मध्यम अल निनो असताना कमी दुष्काळ होता. अलीकडील आकडेवारी पाहता 2009, 2014, 2015 आणि 2018 ह्या अल निनो वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता.
भारतीय मान्सूनवर परिणाम
सुरेश चोपणे म्हणाले, निश्चितच अल निनो वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे आकडेवारी सांगते. मागील दशकात अल निनो वर्षे होती. परंतु पाऊस समाधानकारक पडला होता. प्रत्येक अल निनो वर्षात दुष्काळ पडतोच असे नाही किंवा खूप कमी पाऊस पडतो असेही नाही.
एकूणच इतिहास पाहता कुठल्या श्रेणीचा अल निनो आहे त्यावर कमी अधिक पावसाचे प्रमाण अवलंबून आहे. अल निनोचा प्रभाव भारतीय मान्सूनवर होणार कि नाही त्यासाठी महत्वाचे म्हणजे पॅसिफिक समुद्राच्या कुठल्या भागाचे तापमान अधिक वाढले ह्यावर भारतात पाऊन कमी पडेल का हे अवलंबून आहे.
अन्यथा सरासरी पाऊस पडेल
सुरेश चोपणे म्हणाले, मध्य पॅसिफिकचे आणि भारताकडे येणाऱ्या शाखेचे तापमान वाढले तरच भारतीय मान्सून प्रभावित होतो आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. अन्यथा अल निनो वर्ष असताना सुद्धा सरासरी इतका पाऊस पडू शकतो. पूर्व पॅसिफिक समुद्राचे तापमान वाढल्यास भारतीय मान्सूनवर काहीही प्रभाव पडत नाही. आणि चांगला पाऊस येतो असे चोपणे यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.