आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१९४५ मध्ये नागपुरात भारतीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन झाले होते. शांतीस्वरूप भटनागर हे त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर ७८ वर्षांनंतर म्हणजे २०२३ मध्ये नागपूर विद्यापीठाकडे भारतीय विज्ञान काँग्रेसचे यजमानपद आले. त्याचे सोने करण्याची संधी विद्यापीठाने गमावली असे एकंदरीत चित्र चार दिवसात होते. गलथानपणा आणि अव्यवस्थेचे गालबोट या परिषदेला लागले. ते समारोपापर्यत कायम होते.
शुक्रवारी सकाळी सायंस अॅण्ड सोसायटी मीटचे उद्घाटन सीएसआयआरचे माजी संचालक डॉ. शेखर मांडे यांच्या हस्ते झाले. त्यांनी कुलगुरूंच्या उपस्थितीतच झणझणीत अंजन घातले. भव्यदिव्य आयोजन, मोठमोठे डोम सर्व काही येथे आहेे. फक्त सायंस काँग्रेसची ओळख असलेले अॅकॅडमीक सेशन येथे आहे.
या परिषदेत खुजे आणून उपयोग नाही. विज्ञात आणि तंत्रज्ञानात आब राखून असलेली मंडळी येथे आणायला हवी. वैज्ञानिक समुदायात या सायंस काँग्रेसची क्रेझ नाही. आपले शोध निबंध सादर करण्यास ते फारसे इच्छुक नसतात असे मांडे यांनी सांगितले.
शिल्लक निधीतून उभारले रामन सायंस सेंटर
१९७८ मध्ये नागपुरात झालेल्या सायंस काँग्रेसच्या उद्घाटनाला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या. त्यावेळी आयोजनाचा खर्च जाऊनही बराचसा निधी शिल्लक राहिला. तत्कालीन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री नरसिंहराव यांनी या शिल्लक निधीतून नागपुरला काहीतरी भेट दिली पाहिजे असे म्हणत रामन विज्ञान केंद्राची भेट दिली. आता या सायंस काँग्रेसचे काय होते ते पाहु या असे म्हणत मांडे थांबून गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.