आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऑरेंज सिटी नावाने प्रसिद्ध असलेल्या नागपूरमध्ये देशातील सर्वात मोठा संत्रा सापडल्याचा दावा रितू मल्होत्रा नावाच्या ट्विटर यूजरने केला आहे. त्याने संत्र्याचे काही फोटोही आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. हा संत्रा रितु यांच्या मित्राच्या शेतात उगवल्याची माहिती त्यांनी दिली.
रितुने सांगितल्यानुसार, या संत्र्याचा आकार 24 इंच रुंद आणि 8 इंच ऊंच आहे. तर, वजन 1.425 किलोग्राम आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा संत्रा उगवल्याचा दावा 22 जानेवारी 2006 मध्ये अमेरिकेत करण्यात आला होता. त्या संत्र्याचा आकार 25 इंच होता.
रितुने या संत्र्याचे काही फोटो शेअर केले आहेत
Nagpur the orange city, glorified for the abundance production of oranges has found the largest orange by circumference measured 24 inches and height 8 inches with weight 1.425kg on 23 November 2020. The orange grew in my friend’s farm. #Orange pic.twitter.com/FrnOEGzMHx
— Ritu Malhotra (@iRituMalhotra) November 23, 2020
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.