आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडिगोची इमर्जन्सी लँडिंग:इंडिगो विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग, वैमानिकाला विमानात धूर दिसला; सर्व प्रवाशी सुरक्षित

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. वैमानिकाला विमानात धूर दिसला, त्यानंतर नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. फ्लाइट 6E 7074 हे अहमदाबादहून लखनऊमार्गे नागपूरला जात होते. त्यात 50 प्रवासी आणि 4 कर्मचारी होते. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

पायलटला धूर दिसला

इमर्जन्सी लँडिंगदरम्यान सर्व प्रवासी सुखरुप आहेत. पायलटला विमानात धूर दिसला, त्यानंतर सकाळी 8.33 वाजता विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात धूर कसा निघू लागला, याचा शोध घेण्याचा प्रयत्न इंजिनीअर्सची टीम सातत्याने करत आहे. फ्लाइटमध्ये सर्व काही सामान्य असल्याचे आढळून आले, या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार नागपूर, दिल्ली किंवा लखनऊला नेले जात आहे.

रांची येथे लँडिंग झाले

शनिवारीच झारखंडची राजधानी रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावर इंडिगोच्या कोलकाता-जाणाऱ्या विमानात टेक ऑफ करताना तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण रद्द करण्यात आले होते. इंडिगोच्या 72 आसनी विमानात 62 प्रवासी होते आणि ते सकाळी 9 वाजता उड्डाण करणार होते. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करून, एअरलाइनने सांगितले की, "रांची ते कोलकाता येथे जाणाऱ्या इंडिगो एटीआर फ्लाइट 6E-7562 च्या केबिन एअर कंडिशनिंग उपकरणात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, विमान पार्किंग क्षेत्रात परत आले."

बातम्या आणखी आहेत...