आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सवलत:औद्योगिक वीज वापर शुल्क 9.3 वरून 7.5 टक्क्यांवर, मॅग्नेटिक महाराष्ट्राला चालना मिळणार

नागपूर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 7.5 टक्के दराने विद्युत शुल्क आकारल्यास शासनाच्या महसुलात दरवर्षी रु.440.46कोटी इतकी तूट येणार

उद्योगांना चालना देण्यासाठी स्वस्त वीज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने औद्योगिक वापरातील वीज शुल्कात १.८ टक्के सवलत देण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली.

महाराष्ट्र विद्युत शुल्क अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या प्रशुल्क अनुसूचीनुसार वर्गीकृत केलेल्या दराने वापर आकारावर किंवा वापरलेल्या ऊर्जेच्या युनिटवर विद्युत शुल्क आकारले जाते.

आर्थिक मंदीच्या काळात राज्यात उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने औद्योगिक ग्राहकांसाठी विद्युत शुल्काचे दर ९.३ टक्क्यांवरून ७.५ टक्के करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याचा फायदा सर्व औद्योगिक घटकांना होऊन उद्योगधंद्यांना स्वस्तात वीज उपलब्ध होईल तसेच राज्याच्या मॅग्नेटिक महाराष्ट्र उद्योग उभारणीस चालना मिळेल, असे राऊत यांनी सांगितले.

7.5 टक्के दराने विद्युत शुल्क आकारल्यास शासनाच्या महसुलात दरवर्षी रु.440.46कोटी इतकी तूट येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...