आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:गीतांजली टॉकीज चौकातील गोळीबारात कुख्यात गुंड जखमी; जून्या भांडणातून घडला प्रकार

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

नागपूर येथील तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गीतांजली टॉकीज चौकात सोमवारी पहाटे झालेल्या गोळीबारात जाफर नगर निवासी मोहसीन भूऱ्या पायाला गोळी लागल्याने जखमी झाल्याची घटना घडली. त्याला मेयो हास्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोळीबार करून आरोपी पळून जातानाचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळमना नाका नं. 2 निवासी मुश्फिकने त्याचे साथीदार अल्ताफ मिर्झा याला सोबत घेऊन गोळीबार केला. जून्या भांडणातून हा गोळीबार झाल्याचे समजते. मोहसीन भुऱ्या ताजबागला गेला असून पहाटे परतणार असल्याची माहिती मुश्फिकला होती. म्हणून तो साथीदारासह गीतांजली टॉकीज चौकात दबा धरून बसला होता.

मोहसीन चौकात येताच त्याने गोळीबार केला. त्यात उजव्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. गोळीबारानंतर आरोपी लागलीच तिथून फरार झाले. लोकांनी मोहसीनला मेयोमध्ये भरती केले. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

बातम्या आणखी आहेत...