आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथित सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसेला लवकरच होणार अटक:पोलिस आयुक्तांची माहिती; म्हणाले - पारसे आता मेडिकली फीट

नागपूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कथित सोशल मीडिया विश्लेषक महाठग अजित पारसेला अटक होत नसल्याने नागपूर पोलिस वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. पारसेबद्दलच इतका दयाळूपणा का दाखविण्यात येत आहे, असे प्रश्न त्याच्या अटकेवरून उपस्थित होते होते. गुरूवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पारसे आता मेडिकली फिट असल्याने त्याचे स्टेटमेंट घेतले जाईल असे सांगितले.

गेले अनेक दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अजित पारसे आता पोलिसांना स्टेटमेंट देण्यासाठी (चौकशीसाठी) मेडिकली फिट झाला आहे. तसा वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे पोलिस अजित पारसेची लवकरच चौकशी करतील अशी माहिती नागपूर शहर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. अजित पारसे गेले 42 दिवस रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र गुन्हेशाखा त्याची अटक टाळत होती.

राजकीय नेत्यांशी आणि बड्या अधिकाऱ्यांनी जवळीक असल्याचे सांगून कोट्यवधी रुपये वसूल करणारा महाठग अजित पारसेच्या तब्येतीत सुधारणा झाली असल्याचा वैद्यकीय अहवाल नागपूर पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे भविष्यात त्याला अटक होऊ शकते. अजित पारसेची चौकशी अजूनही होऊ शकलेली नाही. दरम्यान पारसेने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

महाठग अजित पारसेने अनेकांना गंडा घातला असा संशय पोलिसांना आहे,मात्र आतापर्यंत दोनच तक्रारी त्याच्या विरोधात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे अजित पारसेने गंडा घातलेल्यांनी कोणतीही भीती न बाळगता पुढे येऊन तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले आहे.

वैद्यकीय महाविद्यालय मिळवून देण्याच्या बहाण्याने होमिओपॅथी डॉक्टरला साडेचार कोटींनी गंडा घालण्यासह मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने अनेकांना 20 ते 25 कोटींनी चूना लावणारा कथित सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे विरूद्ध गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. मात्र अटक करणे टाळले होते. 12 दिवसांपासून पारसे एका खासगी रूग्णालयात उपचार घेत असल्याने तुर्तास त्याला अटक केलेली नाही. मात्र त्याच्या नवनवीन भानगडी आता समोर येत आहे. सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर पारसेसोबत चॅटींग करणाऱ्या अनेक महिला दहशतीत असल्याचे समोर येत आहे.

बातम्या आणखी आहेत...