आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खादी ग्रामोद्योग आयोगाची माहिती:येत्या तीन महिन्यांत विदर्भात शेणापासून निर्मित रंग निर्मिती यूनिट

नागपूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या तीन महिन्यात विदर्भातील अकराही जिल्ह्यांत शेणापासून निर्मित रंग निर्मिती यूनिट स्थापन करण्यात येईल अशी माहिती खादी ग्रामोद्योग आयोगाचे सदस्य जयप्रकाश गुप्ता यांनी दिली. नितीन गडकरी यांनी 12 जानेवारी 2021 ला खादी व ग्रामोद्योग आयोगाने शेणापासून निर्मित रंग बाजारात आणला. त्यावेळी विदर्भात रंग निर्मिती यूनिट स्थापनेची घोषणा केली होती. मात्र, त्यावेळी कर्ज मर्यादा 25लाख होती. आता ही कर्ज मर्यादा 50 लाख करण्यात आली आहे. या संबंधीचा शासन निर्णयही आठ दिवसांपूर्वीच काढण्यात आला आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

पंतप्रधान रोजगार सृजन असे योजनेतंर्गत बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. त्या अंतर्गत कर्जमर्यादा वाढवण्यात आली आहे. शेणापासून निर्मित रंग इकोफ्रेंडली, विष रहित आहे असा खादी गामोद्योगचा दावा आहे. भारतीय प्रमाणीकरण संस्थेकडून शेणापासून निर्मित रंगाला प्रमाणित करण्यात आले आहे. जयपूर येथील कुमरप्पा नॅशनल हँडमेड पेपर इनस्टिट्यूटने शेणापासून रंग तयार करण्याचे पेटंट मिळवले आहे. "केव्हीआयसी'ने केलेल्या दाव्यानुसार या रंगामध्ये शिसे, पारा, क्रोमियम, आर्सेनिक आणि कॅडमियम या घातक धातुंचा वापर केलेला नाही.

गायीच्या शेणापासून निर्मित या रंगाचे नामकरण "खादी प्राकृतिक पेंट' असे करण्यात आले आहे. हा रंग पर्यावरणपूरक, बिनविषारी, विषाणू आणि बुरशीविरहित असल्याचा दावा "खादी आणि ग्रामोद्योग मंडळा'ने केला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा रंग वासरहित असून, तो डिस्टेम्पर आणि इमल्शन पेंट या दोन प्रकारांत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

विदर्भातील गोपालक शेतकऱ्यांचा यामुळे लाभ होणार आहे. कारण पेंट तयार करण्यासाठी शेण 5 रूपये किलोने विकत घेतले जाणार आहे. गोशाळांमध्ये शेण मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. नागपूर जिल्ह्यातील पाचगाव येथे पहिला रंग निर्मिती कारखाना सुरू करण्यात आला आहे. आता कर्जमर्यादा 50 लाख झाल्यामुळे तीन महिन्यात संपूर्ण विदर्भात रंग निर्मिती कारखाने उभारण्यात येईल, असे गुप्ता यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...