आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्दोष मुक्तता:नागपूर महानगरपालिकेतील २२ वर्षांपूर्वीच्या क्रीडा घोटाळ्यातील सर्व १०१ आरोपींची निर्दोष मुक्तता

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर महापालिकेत २२ वर्षांपूर्वी गाजलेल्या क्रीडा घोटाळाप्रकरणी सर्व १०१ आरोपींची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एन. जी. देशपांडे यांनी मंगळवारी निर्दोष मुक्तता केली. निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये नागपूर पूर्वचे भाजप आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांच्यासह ९९ आजी-माजी नगरसेवक, ६ साहित्य दुकानदार आणि ४ मनपा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणांत एकूण १०८ जणांवर आरोप होता. त्यापैकी ७ जण मरण पावले.

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना २००० साली भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत क्रीडा साहित्य घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नगरविकास खात्याचे तत्कालीन सचिव नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. नगरसेवकांनी क्रीडा मंडळांना साहित्य देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा ठपका नंदलाल यांनी अहवालात ठेवला होता.

याप्रकरणी सुरुवातीला सदर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात भाजपसह काँग्रेस, रिपाई आणि काही अपक्ष नगरसेवकांचाही समावेश होता. दरम्यान, क्रीडा साहित्य घोटाळ्याची चौकशी गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केली होती. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात कलम ४२०, ४०४ आणि ४६८ अन्वये गुन्हे दाखल होते.

प्रमुख नगरसेवक आरोपींची नावे ः तत्कालीन नगरसेवकांमध्ये कृष्णा खोपडे, विकास कुंभारे (विद्यमान आमदार), दयाशंकर तिवारी (विद्यमान महापौर), कल्पना पांडे व अर्चना डेहनकर (माजी महापौर), बळवंत जिचकार, प्रभाकर येवले, बंडू पारवे, राजू बहादुरे, धरम पाटील, मनोहर थूल, सुभाष राऊत, संजय हेजीब, विक्रम पनकुले, दिलीप पनकुले, रमेश सिंगारे, जैतुनबी, मंदा भुसारी, यशवंत मेश्राम, मनीषा दलाल, सुलभा दाणी, नीलिमा गडीकर, सविता काळे, अनिल धावडे, प्रमोद पेंडके, पांडुरंग भानारकर, सिंधू देहलीकर, नंदू घाटे, पुष्पा घोडे आदींचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...