आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय पथकाची गडचिरोलीत पाहणी:पूरग्रस्त भागाला भेट देत शेतकऱ्यांशी केली चर्चा, केंद्राला तातडीने अहवाल सादर करणार

नागपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुलै महिन्यात जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीच्या पुरामुळे 10 हजाराहून अधिक नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले होते. शेती, घरे, रस्ते व जनावरे यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने मंगळवारी सिरोंचा तालुक्यातील आरडा, मुगापूर व मृदुकृष्णापूर या गावांना भेट दिली.

पथकाने सिरोंचा ते कालेश्वरम या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. पथकात केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे उप सचिव रूपक दास तालुकदार, कृषी विभाग संचालक ए. एल. वाघमारे, रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर यांचा समावेश होता.

यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपविभागीय दंडाधिकारी अहेरी श्री.अंकित, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, तहसीलदार सिरोंचा जितेंद्र शिकतोडे, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कृष्णा रेड्डी व तालुका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

ग्रामस्थांशी साधला संवाद

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सिरोंचा येथील झालेल्या नुकसानीबाबत पथकातील सदस्यांना माहिती दिली. पथकातील सदस्यांनी गावांमधील उपस्थित शेतकरी नागरिक यांच्याशी झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली. उपस्थित शेतकरी शेतकऱ्यांनी पथकातील सदस्यांना शेतीविषयक, तसेच जनावरे, जीवित हानी याबाबतची सविस्तर माहिती दिली. पथकाने स्थानिक शेतकऱ्यांसह शेतात जाऊन बांधावर पूरस्थितीची पाहणी केली व तपासणी अहवाल केंद्राकडे सादर करुन आवश्यक ती प्रक्रिया तातडीने करु, अशी ग्वाही दिली.

बातम्या आणखी आहेत...