आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप पदाधिकाऱ्यावर ठाणेदाराचे असेही 'प्रेम':प्रदेश कार्यकारिणीचे सदस्याच्या वाढदिवस निरीक्षक उमेश पाटील यांनी केला ठाण्यात सेलिब्रेट!

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बल्लारपूर पोलिस टीकेची धनी ठरत असून त्यांची भाजपचे माजी नगराध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारणी सदस्यावरील अजब 'यारी'ची गजब चर्चा चांगलीच रंगली आहे. यामुळे ते टीकेचे धनीही ठरत आहेत. भाजपचे हरीश शर्मा यांना त्यांनी पोलिस ठाण्यातून बोलवून चक्क केक कापून वाढदिवस साजरा केला. यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत.

समाजमाध्यमावर चर्चाच चर्चा

बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य हरीश शर्मा यांना पोलिस ठाण्यातून बोलावणे आले. यानंतर तेही काही वेळ बुचकाळ्यात पडले, पण आपण सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहोत. काय होते ते पाहून घेऊ म्हणत कार्यकर्त्यांना घेऊन ठाण्यात हजर झाले. तिथे गेल्यावर ठाणेदाराने त्यांना गुपीत गिफ्टच दिले. त्यांचा चक्क केक कापून वाढदिवस तिथे साजरा झाला. यामुळे त्यांनाही याचे मोठे आर्श्चय झाले.

पोलिस बनले टीकेचे धनी

वाढदिवस बल्लारपूर पोलिस ठाण्यात ठाणेदार उमेश पाटील यांनी केक कापून जल्लोषात साजरा केला. तेव्हापासून समाज माध्यमावर या वाढदिवसाची जोरदार चर्चा आहे. यामुळे बल्लारपूर पोलिस दल टीकेचे धनी झाले आहे.

याआधी घडली ही घटना

काही दिवसांपूर्वीच बल्लारपूर शहर भाजपचे सचिव वाजपेयी यांच्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. ही घटना ताजी असतानाच वाढदिवस साजरा करण्यात आल्यामुळे भाजप नेते पुन्हा चर्चेत आले आहेत. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा वाढदिवस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला तर नवल नाही. पक्षाचा नेता म्हणून अनेक पदाधिकारी वाढदिवस साजरा करीत असतात. परंतु, बल्लारपूर पोलिस ठाण्यात ठाणेदार उमेश पाटील यांच्या कक्षात त्यांच्या टेबलवर केक कापून शर्मा यांचा वाढदिवसाचा साजरा करण्यात आला.समाजमाध्यमाद्वारे वाऱ्यासारखी पसरल्यानंतर या प्लॅटफार्मवर ठाणेदार पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वाढदिवसांपेक्षा ही आव्हाने मोठी

शहरात अनेक बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहे. अंमली पदार्थ आणि कोळसा तस्करीसह इतरही बेकायदेशीर व्यवसायावर आळा घालण्याचे आव्हान ठाणेदार पाटील यांच्यासमोर आहे. विशेष म्हणजे, अवैध व्यावसायिकांचे 'उद्योग' चालूच आहेत. अशा परिस्थितीत हा वाढदिवस चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, हरिश शर्मा यांनी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदही सांभाळले आहे. सध्या ते प्रदेश कार्यकारिणीत सदस्य आहेत. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या अशा पद्धतीने वाढदिवस साजरा होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...