आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची अंतराळ संशोधन संस्था:इस्रोचे ‘स्पेस ऑन व्हील्स’ मुलांमध्ये लोकप्रिय

नागपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो ही अमेरिकेच्या नासा अवकाश संशोधन संस्थेसारखीच आहे. देशात अनेक अंतराळ मोहिमा यशस्वीपणे राबवून या संस्थेने जगभरात देशाचा नावलौकिक मिळवला आहे. अशा संस्थेबद्दल सर्वसामान्यांना फारशी माहिती नसते. ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी इस्रोची “स्पेस ऑन व्हील्स’ बस भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

या बसच्या माध्यमातून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मिशनची आणि आतापर्यंतच्या अंतराळ प्रवासाची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये चांद्रयान-१ मोहीम, मंगळयान मोहीम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह आणि इस्रोचा आतापर्यंतचा एकूण अवकाश प्रवास बघायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...