आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाशी लढा:निर्जंतुकीकरण करून पीपीई किटसह एन-९५ मास्कचा पुनर्वापर आता शक्य

नागपूर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ओझोन, अल्ट्राव्हायोलेट-यूव्हीने जंतुनाशकाचा प्रकल्प तीन आठवड्यांत
  • एक पीपीई किट १० ते १२ तास वापरल्यानंतर फेकून द्यावे लागते.
  • या एका किटकरिता १२०० ते १५०० रुपये मोजावे लागतात

(अतुल पेठकर)

कोरोना योद्धे डाॅक्टर्स आणि परिचारिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पीपीई किट एकदा वापरला की फेकून द्यावा लागतो. मात्र खासदार डाॅ. विकास महात्मे यांच्या सहकार्याने येथील मोनिश भंडारी यांनी केलेल्या संशोधनामुळे पीपीई किटचे निर्जंतुकीकरण करून त्याचा पुनर्वापर करता येणार आहे. यात मोठा खर्च वाचणार आहे. ओझोन आणि अल्ट्राव्हायोलेट-यूव्ही म्हणजे अतिनील किरणांचा वापर करून निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून तीन आठवड्यानंतर पुणे येथे हा प्रकल्प सुरू करण्यात येत असल्याचे डाॅ. महात्मे यांनी सांगितले.

पीपीई किट तसेच एन-९५ मास्कच्या जंतुनाशकाची चाचणी जोधपूर एम्समध्ये घेण्यात आली. ती यशस्वी झाल्यानंतर या तंत्रज्ञानाला हिरवा कंदील देण्यात आला. मोनिश भंडारी यांच्या देशभरात ६० पेक्षा अधिक मशीन्स असून यामुळे प्रति मशीन २ लाख ४० हजार रुपये खर्च वाचणार असल्याचे डाॅ. महात्मे यांनी सांगितले.

एक पीपीई किट १० ते १२ तास वापरल्यानंतर फेकून द्यावे लागते. या एका किटकरिता १२०० ते १५०० रुपये मोजावे लागतात. दिवसेंदिवस पीपीई किटची मागणी वाढतेच आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पीपीई किटची निर्मिती व पुरवठा करणे हे मोठे आव्हान आहे. यावर डाॅ. महात्मे यांनी यासाठी पुढाकार घेत तोडगा काढला.

मोनिश भंडारींची मदत

मास्टर टेक्नाॅलाॅजीचे मोनिश भंडारी यांच्यासोबत संशोधन करून पीपीई किटचे निर्जंतुकीकरण करण्याचा हा उपाय शोधण्यात आला. त्याला इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चची (आयसीएमआर) मान्यता मिळाली आहे. डाॅ. भंडारी यांनी िमनिस्ट्री आॅफ इलेक्ट्राॅनिक्सकडून एका तंत्रज्ञानास मंजुरी घेतली होती. मायक्रोवेव्ह डिसइन्फेक्शनमुळे रोगजंतूंची वाढ खुंटते व ते मरतात. तसेच रुग्णालयांत लागणारे लिनन किंवा तत्सम मटेरियल निर्जंतूक करता येते. देशातील एम्ससह बहुतांश सर्व प्रमुख रुग्णालयात भंडारी यांचे यूनिटस आहेत.

जोधपूर एम्समध्ये चाचणी; हिरवा कंदील