आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदीसाठी उडाली झुंबड:नागपूरमध्ये जिल्हा स्तरीय महिला मेळावा आणि ‘सरस विक्री’ प्रदर्शनाचं आयोजन

नागपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेने 3 जून ते 5 जून दरम्यान आयोजित केलेल्या विभागीय सरस वस्तू व विक्री प्रदर्शनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना बाजारपेठ उपलब्ध झाली. बचत गटांनी तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू व खाद्य पदार्थाचे 150 पेक्षा जास्त स्टॉल मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या परिसरात लावण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू व उत्पादने नागपूरकरांना एकाच ठिकाणी उपलब्ध झाली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिला स्वयं सहाय्यता समूहांची स्थापना करण्यात येते. नागपूर जिल्ह्यात तब्बल 17,241 महिला स्वयं सहाय्यता समूह स्थापन करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील तसेच विभागातील महिलांनी उत्स्फूर्तपणे विभागीय सरस वस्तू व विक्री प्रदर्शनीत सहभाग नोंदविला. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील कोसा साड्यासह विविध बांबू कला, लाकडी वस्तू व कृषी उत्पादने प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण राहिले. चंद्रपूर-गडचिरोली वर्धा येथील बचत गटांनी पारंपरिक वस्तूसोबतच बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध वस्तू तयार केल्या. बचत गटाच्या वस्तू खरेदीसाठी नागपूरकरांची झुंबड उडाली होती.

शंभराच्यावर उत्पादनांची ई-विक्री

शासनाच्या जीईएम आणि खासगी अ‌ॅमेझाॅन या ई-वस्तू विक्री प्रणालीवर नागपूर जिल्ह्यातील तब्बल शंभराच्या वर उत्पादने नोंदणी करण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्यांना ऑनलाइन वस्तू विक्री करण्याचा सुकर मार्ग उपलब्ध झाला आहे. जीईएम पोर्टलवर जवळपास 50 तर अ‌ॅमेझानवर पोर्टलवरही जवळपास 60 उत्पादने आहेत. त्यात कॉपर क्राफ्ट डिझाईन, शर्ट्स, लाखेच्या बांगड्या, लोणची, मिरची, हळद, धना पावडर, आवळा, मुरब्बा, मुखवास, गरम मसाले, लाकडी खेळणी इ. उत्पादने आहेत. ऑनलाइन विक्री प्रणालीच्या माध्यमातून गेल्या तीन महिन्यात 39 ऑर्डर नोंदणीकृत समूहांना मिळाल्या आहेत त्यातून त्यांना जवळपास 78,500 हजार रुपये मिळाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...