आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य:चंद्रकांत हंडोरेंचा पराभव जिव्हारी; किशोर गजभिये यांचा प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा

नागपूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषद निवडणूकीत झालेल्या पराभवातून सरकार कोसळत असताना महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांत त्याचे पडसाद उमटत आहे. काँग्रेसचे प्रथम पसंतीचे उमेदवार व दलित नेते चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव अनेकांना खटकला आहे. तर अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये यांनी हंडोरे यांच्या पराभवामुळे व्यथित होऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

चंद्रकांत हंडोरे हे पक्षाचे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसोबतच ते दलित आणि वंचित समाजाचेही नेते आहे. त्यांच्या पराभवामुळे आंबेडकरी तसेच दलित समाजामध्ये संतापाची भावना आहे. हंडोरे यांचा पराभव दलित जनतेच्या जिव्हारी लागला असल्याची भावना गजभिये यांनी राजीनामा पत्रात व्यक्त केली आहे. हंडोरे हे काँग्रेसचे प्रथम पसंती क्रमाचे उमेदवार होते. हे लक्षात घेता त्यांना पहिल्या पसंतीची मते मिळायला हवी होती. असे असतानाही त्यांना पहिल्या पसंतीची मते मिळाली नाही. हा पक्षक्षिस्तीचा भंग आहे. एकूणच झालेल्या प्रकारामुळे आपल्याला व्यक्तिश: मनस्ताप झालेला आहे. म्हणून हंडोरे यांच्या समर्थनार्थ ऐक्यभाव म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचे गजभिये यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...