आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:बलात्काराच्या आरोपाखाली नागपुरात पत्रकाराला अटक ; माध्यम क्षेत्रात खळबळ

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरात शनिवार पत्रकारांसाठी घातवार ठरला. एका पत्रकाराने आत्महत्या केली. तर दुसऱ्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या घटनेने माध्यम वर्तुळात खळबळ उडाली आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अंबाझरी पोलिसांनी अमित वांडरे या स्थानिक वृत्तवाहिनीत अँकरचे काम करणाऱ्या पत्रकाराला शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. गवळीपुरा, धरमपेठ येथे राहणाऱ्या अमितचे ३५ वर्षीय महिलेशी संबंध होते.

याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, अमित वांडरे हा दोन वृत्तवाहिन्यांमध्ये काम करत होता. वांडरे आणि पीडितेची महाविद्यालयीन जीवनापासून ओळख होती. शिकताना दोघांत चांगली मैत्री झाली. दरम्यान डिसेंबर २०१५ आणि जून २०२१ रोजी वांडरेने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान पीडितेने अमितकडे लग्नासाठी तगादा लावला होता. पीडित तरुणीने लग्नाची गोष्ट काढताच अमित विषय बदलत असे. अमित लग्नाचा विषय टाळत असल्याचे लक्षात येताच पीडितेने अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अमित वांडरेला अटक केली.

तरुण पत्रकाराची गळफास घेऊन आत्महत्या
अन्य एका घटनेत युवा पत्रकार दानिश शेख याने शुक्रवारी मध्यरात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दानिशने अल्पावधीतच फॉरेस्ट बीटमध्ये आपली ओळख तयार केली होती. वैयक्तिक आणि आरोग्याच्या समस्यांमुळे दानिशने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...