आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरमधील धक्कादायक घटना:अत्याचाऱ्याच्या आरोपाखाली पत्रकाराला अटक; तर दुसऱ्याची आत्महत्या

नागपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्रकाराने आत्महत्या केली तर, दुसऱ्याला महिलेवर केलेल्या अत्याचाऱ्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सदरील या घटनेने माध्यम वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे शनिवार हा पत्रकारांसाठी घातवर ठरला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अंबाझरी पोलिसांनी अमित वांडरे या स्थानिक वृत्तवाहिनीत अँकरचे काम करणाऱ्या पत्रकाराला शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली आहे. गवळीपुरा, धरमपेठ येथे राहाणाऱ्या अमितचे 35 वर्षीय महिलेशी संबंध होते.

काय आहे प्रकरण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांडरे याने नुकतेच नागपूर समाचार-24 आणि महाराष्ट्र समाचार-24 अशा दोन वृत्तवाहिन्या सुरू केल्या होत्या. वांडरे आणि पीडितेची महाविद्यालयीन जीवनापासून ओळख होती. दोघेही आंबेडकर काॅलेजचे विद्यार्थी होते. शिकताना दोघांत चांगली मैत्री झाली. दरम्यान डिसेंबर 2015 आणि जुन 2021 रोजी वांडरेने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान पीडिता लग्नाची गोष्ट काढताच वांडरे विषय बदलवत असे. वांडरे लग्नाचा विषय टाळत असल्याचे लक्षात येताच पीडितेने अंबाझरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी लागलीच वांडरेला अटक केली.

घटनेने परिसरात हळहळ

अन्य एका घटनेत युवा पत्रकार दानीश शेख याने शुक्रवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दानीश शेख याने अल्पावधीतच मेहनत घेऊन फाॅरेस्ट बीटमध्ये आपली ओळख तयार केली होती. वैयक्तिक समस्या आणि आरोग्याच्या समस्यामुळे दानीशने आत्मेहत्त्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मानसिक त्रासाने उचलले पाऊल

नागपूर विदर्भात पत्रकाराने आत्महत्या केल्याची ही अलिकडची दुसरी घटना आहे. 10 ऑगस्ट रोजी अकोला येथे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर विरघट यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे तीन चिठ्ठ्या लिहून 10 ऑगस्टच्या रात्री आत्महत्या केली होती. या प्रकरणी अकोट फैल पोलिसांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. 1988 मध्ये उभारलेल्या प्रिंटिंग प्रेस व्यवसायात आठ जणांनी फसगत, विश्वासघात करून गुन्हा दाखल केला. न्यायालयात प्रकरण सुरू असताना त्या आठ जणांनी मानसिक त्रास दिला. याला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे विरघट यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते.

काय होते चिठ्ठीत?

सर्वांवर कारवाई करण्यासाठी कामगार सुशीर वरघट याच्याकडून माहिती घ्यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यापक चौकशीसाठी विशेष चौकशी अधिकारी नियुक्त करावा. सर्व आर्थिक जमानतदारांवर कारवाई करावी. या सर्वांनी सहकार्य केले नाही. मात्र गुन्हेगार केले. हा अन्याय झाला म्हणून न्याय द्यावा, असे चिठ्ठीमध्ये लिहून प्रभाकर विरघट यांनी 10 ऑगस्टला मध्यरात्री भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

बातम्या आणखी आहेत...