आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाळासाहेब ठाकरेंच्या विरोधकांसोबत उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापन केली, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केला आहे.
'मविआ' सरकारने दलाली आणि कमिशन खोरी केली, असा आरोप नड्डा यांनी केला. ते चंद्रपूरमध्ये आयोजित सभेत बोलत होते.
नड्डा काय म्हणाले?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधकांसोबत सत्ता स्थापन केली. मविआ सरकारने दलाली आणि कमिशन खोरी केल्यांचा आरोपही त्यांनी केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावात येऊन हिंदुह्दयसमा्रटाच्या मुलाने सीबीआयकडे तपास देण्यापासून मागे फिरले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला, पहिले उद्धव ठाकरेंना द्यावे लागत होते, मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जावे लागत होते. उद्धव ठाकरेंना देखील काँग्रेसपुढे डोके टेकवावे लागत होते, अशी टीका नड्डा यांनी केली आहे. प्रत्येकांकडे जात डोके टेकवण्याच्या नादात डोक खाली करायची वेळ आली.
उद्धव ठाकरेंनी माफी द्यावी?
महाविकास आघडीमध्ये डिलरशीप, ब्रोकरेंज आणि ट्रान्सफर असा फंडा होता. खूप दुख: झाले होते की मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी 2019 मध्ये बाळासाहेबांचे विरोधक असणाऱ्या लोकांसोबत उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापन केली. अशा लोकांना माफ करायचे का असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी उपस्थित केला आहे.
पंकजा-प्रीतम यांना डावलल्याची चर्चा:भाजपच्या 'मिशन 144' कार्यक्रमासाठी मुंडे भगिनींना निमंत्रणच नाही, राजकीय चर्चांना ऊत
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची आज औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा होणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपने मुंडे भगिनींना डावलल्याची चर्चा सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.