आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला 7 वर्षांचा कारावास:न्यायालयाचा निकाल; नागपूमध्ये 3 वर्षांपूर्वी केला होता अत्याचार

नागपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूरमध्ये एका 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर स्कुल व्हॅन चालकाने अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला 7 वर्षींची कारावासाची शिक्षा, तसेच 5 हजार रुपये दंड न भरल्यास 6 महिने अधिक कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांनी ठोठावली. आशिष मनोहर वर्मा (वय 30) असे आरोपीचे नाव आहे.

काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, 9 जुलै 2019 रोजी एक 6 वर्षांची पीडिता व तिचा 13 वर्षांचा भाऊ हे एम. के. एच. संचेती पब्लिक स्कूल, हिंदुस्थान कॉलनी, वर्धा रोड येथे शिकत होते. पीडित मुलगी इंदिरा नगर, टी. बी. वॉर्ड येथे राहाते. घर व शाळेचे अंतर खूप असल्याने पीडितेचे आईने खासगी स्कूल व्हॅन लावली. एमएच 49, जे 1128 या स्कूल व्हॅनमधून मुलगी शाळेत जाणेयेणे करीत होती. घटनेच्या दिवशी आरोपी स्कूल व्हॅन चालक आशिष वर्मा हा पीडित मुलीला स्कूलव्हॅनमधून तिच्या घरी सोडत असताना तिचा भाऊ पण सोबत होता. रस्त्यात निर्जन ठिकाणी व्हॅन उभी करीत वर्माने पीडितेच्या भावाला समोसे आणण्यासाठी पाठवले होते. व पीडित मुलीला व्हॅनच्या मागच्या सीटवर झोपवून तिच्यासोबत अत्याचार केला. हे सगळे दृश्य तिच्या भावाने पाहिले. सदरील प्रकार घडल्यानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान या दोघांनी घटनेची माहिती आजूबाजूच्या लोकांनी सांगितली.

आरोपीला केली होती अटक

लोकांनी एकत्रित येऊन मागील बाजूचा दरवाजा तोडून मुलीला बाहेर काढले. या घडलेल्या प्रकाराची माहिती आई- वडिलांना कळवण्यात आली. व त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले होते. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती.

या प्रकरणाचा तपास पूर्ण करीत तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून पी. पी. खुळे यांनी काम पाहिले. आरोपीतर्फे अ‍ॅड. शबाहत उल्मा शेख यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...