आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:न्यायमूर्ती भूषण गवईंच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ; सासू-सासऱ्यासह तिघांना अटक, पती फरार

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची मुलगी करिश्मा हिचा तिच्या सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ झाल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला. याप्रकरणी करिश्माचे सासरे पुरुषोत्तम दरोकर (५६), सासू ललिता दरोकर (५२) व संजय टोंगसे (४५) अटक करण्यात आली आहे. पती पलाश दरोकर आणि प्रशांत टोंगसे हे दोघे फरार आहेत.

करिश्माने पती, सासू, सासरे, पतीचे मामा व मामेभाऊ हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार पोलिसांत दिली. या प्रकरणी सीताबर्डी ठाण्यात कलम ४९८ ए, ३२८, ३२३, २९४, ५०४, ५०६, ३४ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल झाला.

करिश्माचा विवाह नागपुरातील ओंकारनगर भागात राहणाऱ्या पलाश दरोकरशी झाला. पण लग्नाच्या काही काळानंतर तिचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला. याप्रकरणी पोलिसांनी हुंड्यासाठी छळ व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत ५ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत सीताबर्डी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त तृप्ती जाधव म्हणाल्या, तीन आरोपींना अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...