आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जवळपास आले आहेत. यात महत्वाचे म्हणजे काही वेगवेगळे निकाल समोर आले आहेत. यात औरंगाबादेतील कन्नड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा निकाल जरा नामनिराळाच आला. सख्या मावस भावांच्या बायका ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, मतमोजणी सुरु असतानाच दोन्ही कन्नड तालुक्यातील गराडा ग्रामपंचायत निवडणुकीत दोन सख्या मावस भावांच्या अर्धागणी निवडणुकीत आमने सामने होत्या. पूजा सचिन राठोड या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर रेश्मा राहुल राठोड एकनाथ या शिंदे गटाकडून रिंगणात होत्या. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. तर आपणच विजय होणार असा दावा देखील दोन्ही गटाकडून करण्यात आला होता. दरम्यान मतमोजणी वेळी दोघींना 540 मतदान झाल्याने चिठ्ठी काढण्यात आली आहे. ज्यात पूजा सचिन राठोड यांचा विजय झाला आहे.
दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी एका ग्रामपंचायतमध्ये समान मते पडल्याचे समोर आले आहेत. औरंगाबाद तालुक्यातील लायगाव ग्रामपंचायत सदस्य पदासाठी समान मत पडली आहे. नामदेव बोंगाणे आणि चंद्रकांत बोंगाणे यांना समान 189 मते पडली होती. त्यामुळे यासाठी चिठ्ठी काढावी लागली. एका लहान मुलीच्या हाताने काढण्यात आलेल्या चिठ्ठीनंतर चंद्रकांत बोंगाणे यांचा विजय झाला आहे.
औरंगाबादमध्ये समान मत पडण्याची ही दुसरी घटना आहे. सोबतच औरंगाबाद जिल्ह्यातील पिंपळगाव पांढरी येथे देखील दोन्ही उमेदवार यांना समान मते पडली आहे. जयश्री ठोंबरे आणि पुष्पा ठोंबरे यांना 145 समान मते पडली होती. त्यामुळे अखेर ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली ज्यात जयश्री ठोंबरे विजयी झाल्या आहेत.
संमिश्र कौल
कन्नड तालुक्यातील 51 ग्राम पंचायतीच्या व सरपंच व सदस्यपदाची मतमोजणी छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मंगळवारी पार पडली. या 51 ग्रामपंचायतीच्या निकालात 35 ग्रामपंचायतीचा आता महिला कारभार हाकलणार आहे. या निवडणुकीत मतदारांचा सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडे संमिश्र कौल दिसून आला आहे.
पॅनलच्या गर्दीत अपक्षही निवडून आले
जनतेतून सरपंच पदाची निवडणूक झाल्याने गावागावात मोठी चुरस निर्माण झाल्याने निकालाकडे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांसह जनतेचे लक्ष लागून होते. यात शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट) भाजप, रायभान जाधव विकास आघाडी, राष्ट्रवादी, काँग्रेस, संजना जाधव समर्थक, या पक्षाच्या नेत्यांनी आप आपल्या परिने ग्राम पंचायतीवर दावा केला असला तरीही या सर्व पक्षांच्या पारड्यात संमिश्र मतदान टाकले.
यासह सर्व राजकीय पक्ष गट तट डावलून काही अपक्ष उमेदवार ही सरपंच पदाच्या निवडणुकीत निवडून आले आहे. निवडणुकीचा निकाल आला निकाल लागताच महाविद्यालयाच्या बाहेर विजय उमेदवारांसह समर्थकांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला.
2 सरपंच, 4 सदस्य उमेदवारांना समान मते
झालेल्या निवडणुकीत तालुक्यातील गराडा येथील पुजा सचिन राठोड याना व त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांस 540 इतकी सारखी मते पडली. चिठ्ठीद्वारे पूजा राठोड यांचा विजय झाला. तर मेहगाव येथील सरपंच पदाच्या कल्याणी नागेश कांदे, रेखा गणेश बोंगाने यांना 539 सारखे मतदान झाले होते यात चिठ्ठीत रेखा गणेश बोंगाने यांचा विजय झाला. पळशी खुर्द - सदस्य अंजना अर्जुन काळे, गौरप्रिपी - सदस्य अजबसिंग सुर्यवंशी, खामगाव - सदस्य अप्पासाहेब गायके, वडनेर - सदस्य छायाबाई चव्हाण, हे सर्व समान मते पडल्याने ईश्वरी चिठ्ठी काढून विजयी झाले.
12 वर्षाच्या मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढली
सर्व ईश्वर चिठ्ठ्या उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार मोनाली सोनवणे यांच्या उपास्थितीत धिरज राजु राठोड या बारा वर्षीय मुलाच्या हस्ते काढण्यात आल्या.
दाव्यांवर दावे
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख केतन काजे यांनी 23 ग्रामपंचायतीवर, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संजय मोटे यांनी 19 ग्रामपंचायतीवर भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष संजय खंबायते यांनी 21 राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव बनसोड यांनी 14 ग्रामपंचायतीवर सत्ता आल्याचा दावा केला असून हा आकडा 77 च्या जवळपास जातो तर ग्राम पंचायती 51 आहे. यामुळे कोणत्या ग्रामपचायटीवर नेमकी सत्ता कोणाची हे सांगणे कठीण झाले आहे.
कन्नड तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीचे सरपंच -
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.