आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:कर्नाटक निवडणुकीत पप्पू फक्त पासच झाला नाही तर मेरिटममध्ये आला- सुषमा अंधारे

नागपूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपा स्लिपर सेलने कायम राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न केले. त्यांना पप्पू म्हणून हीणवले. त्यांची टिंगलटवाळी केली. पण हा पप्पू सगळ्यांचा बाप निघाला. कर्नाटकमधील निवडणुकीत पप्पू फक्त पासच झाला नाही तर मेरिटममध्ये आला असा आनंद शिवसेना नेत्या व प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

कर्नाटकचे निकाल महाविकास आघाडीसाठी शुभ संकेत आहे. हे निकाल देशभरात "मोदी है तो मुमकिन है' असे म्हणणाऱ्यांसाठी चपराक आहे. मागील नऊ वर्षात मोदींनी प्रचंड नकारात्मकतेच हेट पॉलिटिक्स पसरवले आहे. बेरोजगारी, महागाईचा ग्रोथ रेट पाहता कर्नाटकामधील सुजाण जनतेने धडा शिकवला आहे असे अंधारे म्हणाल्या.

कर्नाटकमधील निकालाचा फायदा आणि नवी ऊर्जा येणाऱ्या काळात महाराष्ट्रात पाहायला मिळेल. देवाच्या नावाने मत मागणे ही भाजपाची फार जुनी सवय आहे. भाजपा वेगवेगळ्या आघाडीवर अपयशी ठरते तेव्हा महापुरुषाच्या फोटो आड लपते. महाराष्ट्रामध्ये सावरकर गौरव यात्रा काढण्याचा प्रयत्न त्याचाच एक भाग होता. कधी दोन धर्माच्या लोकांना तर कधी महापुरुषांच्या अनुयायांना लढवायचे ही भाजपाची भूमिका आहे. मात्र हा डाव सर्व लोकांना कळला आहे असे त्या म्हणाल्या.