आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वविक्रम नोंदवणार:नागपुरातील कार्तिकने 1 तासात मारले 3,351 पुशअप; विश्वविक्रम नोंदवणार

नागपूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरातील कार्तिक जयस्वालने बुधवारी एका तासात सर्वाधिक पुशअप मारण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे. विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृहात जागतिक विक्रम मोडण्याचे लक्ष्य १ तासात ३१८२ पुशअप होते. त्याने एका तासात ३,३५१ पुशअप मारत नवा विक्रम बनवला. यापूर्वीचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल स्कालीच्या नावावर होता. कार्तिक एमएमए फायटर, भारत आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर खेळाडू आहे. पुशअप्सचा नवा विक्रम करण्यासाठी तो गेल्या दोन वर्षांपासून ६ तासांपेक्षा जास्त सराव करीत होता. रवी मेंढे आणि मिश्र मार्शल आर्ट्स प्रशिक्षक युगांत उगले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत होता. तो जागतिक विक्रम मोडण्यासाठी व त्याची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी १ तास ध्यान करायचा.

बातम्या आणखी आहेत...